ट्रोलरने बॉडी पार्ट्सवर केले कमेंट, तापसी पन्नूने दिले असे उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 13:57 IST2018-12-18T13:56:27+5:302018-12-18T13:57:29+5:30
सोशल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूडसाठी नवे नाही. या यादीत ताजे नाव आहे ती, अभिनेत्री तापसी पन्नू हिचे. होय, चित्रपटांत अनेक दमदार भूमिका साकारणारी तापसी सोशल मीडियावर ट्रोल झाली.

ट्रोलरने बॉडी पार्ट्सवर केले कमेंट, तापसी पन्नूने दिले असे उत्तर!
ठळक मुद्देट्रोलरने असे काही म्हटले की, तापसी खवळली. अर्थात ट्रोलरला काही उलटसुलट उत्तर देण्याऐवजी, तिने त्याला त्याच्याच भाषेत सुनावले.
सोशल मीडियावर ट्रोल होणे बॉलिवूडसाठी नवे नाही. या यादीत ताजे नाव आहे ती, अभिनेत्री तापसी पन्नू हिचे. होय, चित्रपटांत अनेक दमदार भूमिका साकारणारी तापसी सोशल मीडियावर ट्रोल झाली. ट्रोलरने असे काही म्हटले की, तापसी खवळली. अर्थात ट्रोलरला काही उलटसुलट उत्तर देण्याऐवजी, तिने त्याला त्याच्याच भाषेत सुनावले. आता नेमके काय झाले ते वाचा...
Wow! I like them too. BTW which is your favourite ? Mine is the cerebrum. https://t.co/3k8YDbAL64
— taapsee pannu (@taapsee) December 17, 2018
तर या ट्रोलरने तापसीच्या बॉडी पार्ट्सवर कमेंट केली. तापसी, मला तुझे बॉडी पार्ट्स खूप आवडतात, असे या ट्रोलरने लिहिले. यावर तापसीने काय उत्तर द्यावे? ‘व्वा, मला पण ते आवडतात. पण तुला सर्वाधिक काय आवडते? मला तर माझा मेंदू सर्वाधिक आवडतो,’ असे तापसी म्हणाली. तापसीच्या या उत्तराने ट्रोलरच्या मेंदूचा भूगा झाला नसेल तर नवल...
तापसीच्या कामाबद्दल सांगायचे तर, सध्या ती ‘मंगल मिशन’ या चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, शरमन जोशी असे अनेक दिग्गज स्टार आहेत.
2013मध्ये तापसीने ‘चश्मेबहाद्दूर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तापसीने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. तापसीने पिंक , बेबी , नाम शबाना , जुड़वा 2 , सूरमा , द गाजी अटॅक यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे