टॉम क्रूजने पुन्हा रिक्रिएट केला ३२ वर्षांपूर्वीचा सीन! जेनिफरने केले किस!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 15:52 IST2018-11-05T15:51:39+5:302018-11-05T15:52:07+5:30
हॉलिवूड स्टार टॉम क्रूज सध्या ‘टॉप गन’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे. या चित्रपटा जेनिफर कोनेली मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात आधी केली मॅकगिल लीड भूमिकेत दिसली होती. याच सेटवरचा एक फोटो सध्या इंटरनेटच्या जगात वेगाने व्हायरल होत आहे.

टॉम क्रूजने पुन्हा रिक्रिएट केला ३२ वर्षांपूर्वीचा सीन! जेनिफरने केले किस!!
हॉलिवूड स्टार टॉम क्रूज सध्या ‘टॉप गन’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे. या चित्रपटा जेनिफर कोनेली मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात आधी केली मॅकगिल लीड भूमिकेत दिसली होती. याच सेटवरचा एक फोटो सध्या इंटरनेटच्या जगात वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोत जेनिफर टॉम क्रूजला किस करताना दिसतेय. होय, टॉमने ३२ वर्षांपूर्वीचा मोटरबाईक सीन पुन्हा एकदा रिक्रिऐट केला आणि जेनिफर टॉमला किस करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.
‘टॉप गन’ हा चित्रपट १९८६ मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी टॉमचे वय होते २४. आता तो ५६ वर्षांचा आहे. अर्थात मोटरबाईकच्या फोटोंमध्ये त्याची स्टाईल अगदी तशीच आहे, जी ३२ वर्षांपूर्वी दिसली होती.
‘टॉप गन’ चित्रपट १०२८ स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. हा चित्रपट १९८६ चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. आता याचा सीक्वल कती धूम करतो, ते बघूच.