विराटसोबत अनुष्का शर्मा नाही तर ही विदेशी तरूणी चढली असती बोहल्यावर, मात्र शेवटच्या क्षणी घडल्या अशा घडमोडी आणि......
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 06:00 IST2020-07-22T06:00:00+5:302020-07-22T06:00:02+5:30
एका जाहिरातीवेळी अनुष्का विराट एकत्र काम करत होते. त्याचवेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. 4 वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

विराटसोबत अनुष्का शर्मा नाही तर ही विदेशी तरूणी चढली असती बोहल्यावर, मात्र शेवटच्या क्षणी घडल्या अशा घडमोडी आणि......
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. सेलिब्रेटींवर लाखों तरूण-तरूणी जीव ओवाळून टातकतात आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसह लग्न करण्याचे स्वप्न पाहतात असेच काहीसे स्वप्न इग्लंडची महिला क्रिकेट टिमची खेळाडू सारा टेलर हिने पाहिले होते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्न करण्याचे तिची इच्छा असल्याचे बोलले जाते. इतकेच नाहीतर साराने ट्विटरवरच विराटला प्रपोज केले होते. सारा विराटची मोठी फॅन आहे. तिला विराट खूप आवडतो.
मात्र त्यावेळी विराट लग्नासाठी तयार नव्हता.करिअरवर त्याने त्याचे सर्व लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे लग्न करण्याचा विचारही त्याच्या डोक्यात नव्हता. विराटच्या आईला देखील विराटने करिअरवरच लक्ष द्यावे, योग्य वेळ आली की लग्न करावे असे सांगिते होते. जर विराटच्या आईने साराकडे लक्ष दिले असते तर आज अनुष्काच्या जागी सारा असली असती अशा गप्पा सोशल मीडियावर रंगतात. विशेष म्हणजे साराही अनुष्कापेक्षा खूप सुंदर आहे.
एका जाहिरातीवेळी अनुष्का विराट एकत्र काम करत होते. त्याचवेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. 4 वर्ष दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘राजेशाही’ लग्नाची संपूर्ण देशातच नाही तर जगभरात चर्चा झाली. या दोघांचे लग्न बघून अनेक मुलींनी आपले लग्न देखील असेच व्हावे अशी स्वप्न रंगविली होती.