'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 11:03 IST2025-07-18T11:02:37+5:302025-07-18T11:03:50+5:30

Sholey Movie : रमेश सिप्पी यांच्या शोले सिनेमाशी संबंधित अनेक इंटरेस्टिंग कथा आहेत. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या क्लासिक चित्रपटाने त्यातील कलाकारांना तसेच त्याचे चित्रीकरण झालेल्या ठिकाणालाही प्रसिद्धी मिळवून दिली.

This is the location of Gabbar's base in 'Sholay', the road built by the makers for shooting has now become a tourist spot | 'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ

'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ

रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांच्या 'शोले' (Sholey Movie) सिनेमाशी संबंधित अनेक इंटरेस्टिंग कथा आहेत. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या क्लासिक चित्रपटाने त्यातील कलाकारांना तसेच त्याचे चित्रीकरण झालेल्या ठिकाणालाही प्रसिद्धी मिळवून दिली. शोलेची संपूर्ण कथा रामगढ नावाच्या गावाभोवती गुंफलेली होती. संपूर्ण चित्रपटात हे गाव उत्तर भारतात असल्याचे दाखवण्यात आले होते, पण सत्य कल्पनेच्या पलीकडे आहे म्हणजेच ते थक्क करणारं आहे.

शोलेमध्ये संजीव कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, अमजद खान, हेमा मालिनी आणि जया बच्चन यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा जय आणि वीरू या दोन मित्रांभोवती फिरते, ज्यांची भूमिका अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी साकारली आहे. दोघांनाही एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने डाकू गब्बर सिंगला पकडण्यासाठी कामावर ठेवले आहे. त्या सर्वांमध्ये एक दुवा आहे, जो त्यांना संपूर्ण चित्रपटात जोडून ठेवतो आणि ते म्हणजे रामगढ गाव.

शोलेचा रामगढ कुठे आहे?
शोलेचा रामगढ दक्षिण भारतात आहे. तो कर्नाटकातील बंगळुरूजवळील रामनगर या खडकाळ भागात आहे. या भागात चित्रपटाचे चित्रीकरण करणे सोपे नव्हते. शोलेच्या निर्मात्यांना बंगळुरू महामार्गापासून रामनगरपर्यंत एक लांब रस्ता तयार करावा लागला, जेणेकरून सर्व शूटिंगचं साहित्य आणि वाहतूक सहज करता येईल. शोलेचे रामगढ गाव देखील तयार करण्यात आले होते, जे कला दिग्दर्शक राम येडेकर यांनी तयार केले होते.

गावाचं बदलण्यात आलं नाव
एकेकाळी रामनगरच्या एका भागाचे नाव दिग्दर्शकाच्या नावावरून 'सिप्पी नगर' ठेवण्यात आले होते. आता हे ठिकाण एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. रामनगरला जाणाऱ्या लोकांना शोलेच्या टेकड्यांवर फिरण्याची संधी मिळते, जिथे गब्बर सिंग आणि त्याच्या मित्रांचे लपण्याचे ठिकाण होते. मात्र, चित्रपटाचे दृश्ये या गावात चित्रीत करण्यात आले नाहीत.

हे ठिकाण देखील बनला शोलेचा भाग 
शोलेमधील तुरुंग आणि ट्रेन लुटण्याचे दृश्ये या रामनगर गावाबाहेर चित्रीत करण्यात आले. मुंबईतील राजकमल स्टुडिओजवळ तुरुंगाचा सेट बांधण्यात आला होता, जेणेकरून सूर्याच्या नैसर्गिक प्रकाशात शूटिंग करता येईल. त्याच वेळी, पुणे आणि पनवेलला जाताना 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे' हे गाणे चित्रीत करण्यात आले होते.

Web Title: This is the location of Gabbar's base in 'Sholay', the road built by the makers for shooting has now become a tourist spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.