ऐश्वर्या रायसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या रिलेशनमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:39 PM2024-01-02T14:39:02+5:302024-01-02T14:41:51+5:30

Tv actress: या अभिनेत्रीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, तिचं वैवाहिक जीवन सर्वाधिक चर्चेत राहिलं.

this-girl-with-aishwarya-rai-became-the-most-beautiful-talented-and-glamorous-girl-who-is-she | ऐश्वर्या रायसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या रिलेशनमुळे आली होती चर्चेत

ऐश्वर्या रायसोबत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं का? करण सिंग ग्रोव्हरसोबतच्या रिलेशनमुळे आली होती चर्चेत

कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. विशेष म्हणजे एकेकाळी आपल्या निरागसपणामुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारे हे कलाकर आज त्यांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे.  या फोटोमध्ये ही अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसोबत दिसत असून आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत एक लहान मुलगी दिसून येत आहे. हा फोटो 'कुछ ना कहो'(kuch na kaho) या सिनेमात आहे. या सिनेमात दिसत असलेल्या बालकलाकाराने पूजा ही भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमानंतर ही चिमुकली अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये झळकली. इतकंच नाही तर आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच ही अभिनेत्री नेमकी कोण आहे?  हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

फोटोत दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून जेनिफर विंगेट (Jennifer Winget) आहे. जेनिफरने वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं. त्यानंतर 'सरस्वती चंद्र'मधील कुमुद देसाई, 'बेहद'मधील माया मल्होत्रा ​​आणि 'बेपनाह'मधील झोया सिद्दिकी अशा किती तरी मालिकांमधील तिच्या भूमिका गाजल्या.

दरम्यान, जेनेफिर मुंबईत लहानाची मोठी झाली. तिचे वडील हेमंत विंगेट रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर आई गृहिणी आहे. जेनिफरला मोझेस हा एक भाऊ देखील आहे. २००५ मध्ये जेनिफरने को-स्टार करण सिंग ग्रोव्हरला डेट करायला सुरुवात केली होती. 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोच्या सेटवर तिची भेट झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ९ एप्रिल २०१२ रोजी करण आणि जेनिफर दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या २ वर्षानंतर २०१४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

२०२३ मध्ये शाहरुख खानचे तीन सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी तुम्हाला कोणता सिनेमा जास्त आवडला?

VOTEBack to voteView Results

Web Title: this-girl-with-aishwarya-rai-became-the-most-beautiful-talented-and-glamorous-girl-who-is-she

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.