चॅलेंज! आईच्या खांद्यावर बसलेली ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची मोठी सुपरस्टार, ओळखलं का तुम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 15:34 IST2022-03-05T15:31:01+5:302022-03-05T15:34:41+5:30
Bollywood Actress : आतापर्यंत अनेक फिल्मी स्टार्सचे बालपणीने फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. यातलाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चॅलेंज! आईच्या खांद्यावर बसलेली ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची मोठी सुपरस्टार, ओळखलं का तुम्ही?
Bollywood Actress Childhood Photo : सोशल मीडिया एक असं ठिकाण हे जिथे काहीही व्हायरल होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर सोशल मीडियावर बॉलिवूडसेलिब्रिटींचे बालपणीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो समोर येताच फॅन्स त्यांना ओळखण्याच्या प्रयत्नात आहेत. आतापर्यंत अनेक फिल्मी स्टार्सचे बालपणीने फोटो तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. यातलाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सोशल मीडियावर बॉलिवूडच्या एका मोठ्या अभिनेत्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत बॉलिवूडची ही अभिनेत्री तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे. खांद्यावर बसून ही चिमुकली हसताना दिसत आहे. ती आईसोबत मस्ती करत आहे. तुम्ही ओळखलं का? या अभिनेत्रीने केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. तुम्ही अजूनही ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो. ही अभिनेत्री आहे हुमा कुरेशी.
हुमा कुरेशी सुपरहिट सिनेमा 'गॅंग्स ऑफ वासेपूर'मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये हुमा दिसली. बॉलिवूडच्या अनेक स्टार्ससोबत तिने काम केलं. इतकंच नाही तर ती हॉलिवूड सिनेमा 'आर्मी ऑफ द डेड'मध्येही दिली होती. हुमाचा भाऊ साकिब सलीमही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. आगामी अनेक वेबसीरीज आणि सिनेमात हुमा कुरेशी दिसणार आहे.