सावत्र वडिलांचं लावते आडनाव, डेब्यू सिनेमातूनच झाली सुपरस्टार; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 19:07 IST2023-05-04T16:09:00+5:302023-05-04T19:07:37+5:30
या अभिनेत्रीने वयाच्या १८ व्या वर्षी एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकला. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

सावत्र वडिलांचं लावते आडनाव, डेब्यू सिनेमातूनच झाली सुपरस्टार; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला?
बऱ्याचदा कलाकार त्यांच्या बालपणींचे फोटो आणि त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. दरम्यान असाच एक बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीचाही बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतील चिमुरडीला तुम्ही ओळखलंत का?, आम्ही तुम्हाला सांगतो की कोण आहे ही अभिनेत्री. या अभिनेत्रीला तिच्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळाली.
बंगाली आई आणि जर्मन वडिल असलेल्या या अभिनेत्री तिच्या सावत्र वडिलांचे आडनाव वापरते. तुम्ही आता या सुंदर अभिनेत्रीला ओळखले आहे का? आम्ही तुम्हाला हिंट देतो या अभिनेत्रीने वयाच्या १८ व्या वर्षी एशिया पॅसिफिकचा खिताब जिंकला. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.
अजून तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधली ही मुलगी अभिनेत्री दिया मिर्झा आहे. दिया मिर्झाच्या आई आणि वडिलांचा काही वर्षांनी घटस्फोट झाला. नंतर दियाच्या आई जी बंगाली हिंदू होती, अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केले. अहमद यांनी दियाला मनापासून आपलं मानलं आणि तिला त्यांचं नावही दिलं. त्यामुळे दिया तिच्या सावत्र वडिलांचेच आडनाव वापरते.
दिया मिर्झाने आर माधवनसोबत 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दियाच्या कामाचीही दखल घेतली गेली. दिया दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दम, परिणीता, लगे रहो मुन्नाभाई आणि संजू सारख्या यशस्वी चित्रपटांचा एक भाग आहे.