चॅलेंज! फोटोतील 'हा' क्यूट मुलगा आज आहे बॉलिवूडचा मोठा स्टार, तुम्ही ओळखलंत का याला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:03 IST2022-02-10T18:57:37+5:302022-02-10T19:03:42+5:30
Bollywood Celebrity : बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. तुम्हीही अनेक फोटो पाहिले असतील. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

चॅलेंज! फोटोतील 'हा' क्यूट मुलगा आज आहे बॉलिवूडचा मोठा स्टार, तुम्ही ओळखलंत का याला?
आपल्या फेवरेट बॉलिवूड स्टार्सबाबत फॅन्सचं प्रेम इतकंच असतं की, त्यांना आपल्या लाडक्या कलाकाराबाबत सगळं जाणून घ्यायचं असतं. लोक आपल्या फेवरेट हिरोचा बालपणीचा फोटो, त्यांचा लूक, त्यांच्याबाबत सगळंकाही जाणून घेण्यास उत्सुक असतात. बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. तुम्हीही अनेक फोटो पाहिले असतील. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हा फोटो पाहिल्यावर लगेच लक्षात येत नाही की कोण असेल. पण हा चिमुकला आज बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार आहे.
हा फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. पण अनेकांना माहीत नाही की, हा फोटो कुणाचा आहे. आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. हा फोटो आहे बॉलिवूड किंग, रोमान्स किंग सुपरस्टार शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा. अनेक दशकांपासून शाहरूख खान फॅन्सच्या मनात घर करून आहे. आजही त्याच्यासाठी फॅन्स क्रेझी होतात.
शाहरूख बालपणी अधिकच क्यूट दिसत होती. तुमच्या लक्षात येत असेल तर शाहरूख खान बालपणी त्याच्या सर्वात लहान मुलगा अबरामसारखा दिसतोय. त्याचा हा क्यूट फोटो पाहिल्यावर कुणालाही लाड करावे वाटतील. शाहरूख खान आज जगभरात लोकप्रिय आहे.
दिल्लीमध्ये जन्माला आलेल्या शाहरूख खानच्या वडिलांचं नाव मीर ताज मोहम्मद खान आहे आणि त्याचं आईचं नाव लतीफ आहे. किंग खानचे वडील पाकिस्तानच्या पेशावरमधून दिल्लीला आले होते. हंसराज कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यावर शाहरूखन थिएटर सुरू केलं. त्याने सुरूवातीला दिल दरिया, फौजी आणि सर्कससारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं. नंतर तो बॉलिवूड किंग बनला. आता त्याची मुलगी सुहाना खानही बॉलिवूडमध्ये डेब्यूसाठी तयार आहे.