Guess Who: सलीम खान यांच्या खांद्यावर बसलेल्या मुलीला ओळखलं का? सख्या मुलीपेक्षाही जास्त जवळचं आहे त्यांचं नात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 15:23 IST2022-01-23T15:23:14+5:302022-01-23T15:23:54+5:30
Salim khan: ही चिमुकली सलीम खान यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रचंड खास असून या मुलीवर आख्खं कुटुंब जीवापाड प्रेम करतं.

Guess Who: सलीम खान यांच्या खांद्यावर बसलेल्या मुलीला ओळखलं का? सख्या मुलीपेक्षाही जास्त जवळचं आहे त्यांचं नात
सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक चिमुकली सलमान खान खानच्या (salman khan) वडिलांच्या म्हणजेच सलीम खान (Salim Khan) यांच्या खांद्यावर बसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा फोटो पाहिल्यानंतर ही मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, ही चिमुकली सलीम खान यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रचंड खास असून या मुलीवर आख्खं कुटुंब जीवापाड प्रेम करतं. त्यामुळेच 'खान'दानाची जीव असलेली ही मुलगी कोण ते जाणून घेऊयात.
छोट्या पडद्यावर व्हायरल होत असलेला फोटो प्रचंड जुना असून हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक मुलगी सलीम खान यांच्या खांद्यावर बसली आहे. विशेष म्हणजे ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून अर्पिता खान (Arpita Khan Sharma) आहे.
सलीम खान यांनी अर्पिता लहान असतांनाच तिला दत्तक घेतलं होतं. परंतु, त्यांनी सख्या मुलांमध्ये आणि अर्पितामध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी सगळ्या मुलांना समान वागणूक आणि प्रेम दिलं. इतकंच नाही तर आज तीनही खान भावंडांमध्ये अर्पिता सगळ्यात जास्त लाडकी असल्याचं पाहायला मिळतं.
दरम्यान, सलीम खान आणि हेलन यांना मुंबईतील एका रस्त्यावर अर्पिता सापडली होती. यावेळी अर्पिता तिच्या आईच्या मृत शरीराजवळ बसून रडत होती. त्यावेळी तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून सलीम खान यांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात येतं.