'ना कजरे की धार..' गाण्यातून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री, आता दिसते खूपच बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:38 IST2025-04-07T18:36:29+5:302025-04-07T18:38:02+5:30

नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या पहिल्याच सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र कालांतराने या अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दुरावल्या.

This actress, who became an overnight star with the song 'Na Kajre Ki Dhar..', now looks very bold | 'ना कजरे की धार..' गाण्यातून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री, आता दिसते खूपच बोल्ड

'ना कजरे की धार..' गाण्यातून रातोरात स्टार झालेली ही अभिनेत्री, आता दिसते खूपच बोल्ड

नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्यांना त्यांच्या पहिल्याच सिनेमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली. मात्र कालांतराने या अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दुरावल्या. या यादीत नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम झावर(Poonam Jhawer)चा समावेश आहे. मोहरा या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'ना कजरे की धार, ना मोतियों का हार' या सुपरहिट गाण्यात सुनील शेट्टी(Suniel Shetty)सोबत पूनम झावर दिसली होती. हे गाणे त्या काळी लोकांच्या ओठावर असायचे. आजही हे गाणे चाहत्यांच्या हिटलिस्टमध्ये आहे.

पूनम झावर 'मोहरा' चित्रपटात सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. या दोघांवर 'ना कजरे की धर, ना मोतियों का हार' हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे.  'ना कजरे की धार' या गाण्यातून पूनम रातोरात प्रसिद्ध झाली. 'मोहरा'मध्ये तिने प्रिया मल्होत्रा ​​नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.मोहरा चित्रपटानंतरही ती इतर काही चित्रपटांमध्ये दिसली, ती दीवाना हूं मैं तेरा, आंच, द ब्लॅक अँड व्हाइट फॅक्ट, ओह माय गॉड आणि आर राजकुमार यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली. आर राजकुमार हा २०१३ साली रिलीज झाला होता, हा पूनम झावरचा शेवटचा चित्रपट होता.

या गाण्यात झळकली अभिनेत्री

ना कजरे की धार गाण्यानंतर पूनम इतर अनेक गाण्यांमध्ये दिसली हे फार कमी लोकांना माहीत असेल. 'हाय शरमाऊं' या गाण्यात ती पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसली होती. हे गाणे जुने असले तरी पूनमच्या चाहत्यांना तिचा हा लूक नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओमध्ये ती अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसली होती. तिचा हा लूक पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही की ती तीच पूनम आहे. 


आता तिला ओळखणं झालंय कठीण

सध्या पूनम झावर मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती पूर्वीपेक्षा खूप बदलली आहे. तिचे वजन थोडे वाढले आहे. आता ती एक अनामिक जीवन जगत आहे. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. ती अनेकदा तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिला या लूकमध्ये ओळखणे कठीण आहे.

Web Title: This actress, who became an overnight star with the song 'Na Kajre Ki Dhar..', now looks very bold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.