'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 13:02 IST2025-02-10T13:01:35+5:302025-02-10T13:02:40+5:30

Hum Aapke Hai Kaun Movie: 'हम आपके है कौन' चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या इंडियन आयडॉलमध्ये आले होते. जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या.

This actress was the first choice to replace Madhuri Dixit in 'Hum Aapke Hai Kaun', but... | 'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण...

'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण...

सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांचा चित्रपट 'हम आपके है कौन' (Hum Aapke Hai Kaun Movie) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. आजवर या चित्रपटातील गाणी, त्याची कथा आणि प्रेम-निशा यांच्यातील केमिस्ट्री लक्षात राहते. हम आपके है कौन हा नव्वदच्या दशकातील हिट चित्रपटांपैकी एक होता. अलिकडेच, चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या इंडियन आयडॉलमध्ये आले होते. जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या. सूरज बडजात्या यांनी सांगितले की, 'निशा'च्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित माझी पहिली पसंती नव्हती. आधी त्यांना निशाच्या भूमिकेसाठी करिश्मा कपूर(Karishma Kapoor)ला कास्ट करायचे होते, असे त्यांनी सांगितले.

सूरज बडजात्या टीव्ही रिॲलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झाले होते जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, त्यावेळी करिश्माने त्यांना 'प्रेम कैदी' चित्रपट पाहण्यासाठी बोलावले होते. प्रेम कैदीमधील तिचा अभिनय पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांना तिला आपल्या चित्रपटात कास्ट करायचे होते.

करिश्माच्या हातून असा निसटला सिनेमा
सूरज बडजात्या म्हणाले की मी तिचा चित्रपट पाहून परत आलो आणि मी माझ्या वडिलांना सांगितले, मी नुकताच करिश्माचा चित्रपट पाहिला आहे. तिच्यात प्रचंड उत्साह दिसून येत होता. मी सध्या हम आपके है कौन लिहित आहे आणि आम्हाला निशाच्या भूमिकेसाठी कोणाची तरी गरज आहे. मात्र, वडील राजकुमार बडजात्या यांना याबाबत खात्री नव्हती. या भूमिकेसाठी करिश्मा खूपच लहान असल्याचे त्यांना वाटले. त्यांनी सांगितले की, तिला मोहनीश बहलच्या मुलांना ऑन-स्क्रीन स्वीकारावे लागेल, ही तिच्यासाठी मोठी जबाबदारी असू शकते, कारण ती खूपच तरुण दिसत होती. ते म्हणाले, 'एखाद्याला घ्या जो तो भार उचलू शकेल.' ती जर थोडी मोठी असती तर ही भूमिका तिला ऑफर झाली असती.

Web Title: This actress was the first choice to replace Madhuri Dixit in 'Hum Aapke Hai Kaun', but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.