करिश्मा नव्हे, 'राजा हिंदुस्तानी'साठी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती; 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:47 IST2025-11-04T15:47:22+5:302025-11-04T15:47:59+5:30
Raja Hindustani Movie: 'राजा हिंदुस्तानी'मध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. दोघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

करिश्मा नव्हे, 'राजा हिंदुस्तानी'साठी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती; 'या' कारणामुळे नाकारला सिनेमा
ऐश्वर्या राय बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'ताल', 'हम दिल दे चुके सनम', 'रेनकोट' यांसारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ऐश्वर्या आता मोठ्या पडद्यावर कमी दिसत असली तरी, तिचे चाहते तिला मिस करतात. ऐश्वर्याने अनेक असे चित्रपट केले आहेत, ज्यांमुळे आजही तिची आठवण काढली जाते. मात्र, तिने नाकारलेले असेही अनेक चित्रपट आहेत. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नव्हे, तर ऐश्वर्या रायला पहिली पसंती होती.
'राजा हिंदुस्तानी'मध्ये आमिर खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. दोघांनीही आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना प्रभावित केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 'राजा हिंदुस्तानी'साठी सुरुवातीला ऐश्वर्या रायला विचारणा करण्यात आली होती, पण तिने यासाठी नकार दिला होता.
ऐश्वर्याने का नाकारला सिनेमा?
ऐश्वर्या रायने 'और प्यार हो गया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती बॉबी देओलसोबत मुख्य भूमिकेत होती. ऐश्वर्या राय चित्रपट निर्मात्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यापूर्वीच तिला अनेक चित्रपट ऑफर झाले होते. मात्र, तिने त्या सर्व चित्रपटांना नकार दिला होता आणि तिला तिच्या सौंदर्य स्पर्धेवर लक्ष केंद्रित करायचे होते. या सर्व प्रोजेक्ट्समध्ये धर्मेश दर्शन यांचा 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाचाही समावेश होता, ज्यासाठी तिने नकार दिला होता.
'राजा हिंदुस्तानी' असता ऐश्वर्याचा पहिला चित्रपट
२०१२ मध्ये वोगला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने स्वतः याबाबत खुलासा केला होता. ती म्हणाली होती, "बऱ्याच लोकांना असे वाटते की मी ब्युटी पेजेंटमधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, पण माझ्या बाबतीत ते तसे नव्हते." ती पुढे म्हणाली, "पेजेंट्सपूर्वीच माझ्याकडे चार चित्रपट होते. मी मिस इंडियामध्ये भाग घेण्यासाठी काही काळासाठी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. जर मी कोणत्याही सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला नसता, तर 'राजा हिंदुस्तानी' हा माझा पहिला चित्रपट ठरला असता."