‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

By अबोली कुलकर्णी | Updated: December 4, 2018 18:25 IST2018-12-04T18:25:39+5:302018-12-04T18:25:46+5:30

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली.

'These' foreign actresses fall in love with foreign celebrities | ‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

‘या’ देसी अभिनेत्री भाळल्या विदेशी सेलिब्रिटींवर...जाणून घ्या कोण ?

अबोली कुलकर्णी

 बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे विदेशी कलाकारांबाबतीतील आकर्षण काही नवे नाही.  याच आकर्षणामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्री या देशी सोडून विदेशी सेलिब्रिटींच्या प्रेमात पडताना दिसत आहेत. आता हेच बघा ना, बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने तिच्या आयुष्याचा साथीदार म्हणून अमेरिकेच्या पॉप सिंगर निक जोनासची निवड केली. विदेशी नवरा नको म्हणत म्हणत ती स्वत:च विदेशी सून बनली. बरं, आता असं करणारी पीसी ही पहिलीच अभिनेत्री आहे, असे नाही. तर पाहूयात आत्तापर्यंत कोणकोणत्या अभिनेत्रींनी विदेशी सेलिब्रिटींसोबत  आयुष्याची दोरी जोडली. 

* माधुरी दीक्षित-नेने
 बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित-नेने हिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. लाखों दिलाची धडकन म्हणून तिच्याकडे बघितले जाते. जेव्हा माधुरीचे करिअर हे एकदम जोरात होते तेव्हा तिचे नाव अनेक कलाकारांसोबत जोडले गेले होते.  मात्र, तिने विदेशातील भारतीय वंशाचे डॉक्टर श्रीराम माधव नेने यांच्यासोबत लग्न केले. 

*  प्रिती झिंटा
  ‘गालावर खळी...’ असं जिच्याबद्दल म्हणता येईल अशी प्रिती झिंटा तिच्या  हटके आणि खोडकर अदांनी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडची डिंपल गर्ल असेच तिला म्हणतात.  तिने अमेरिकेचा इन्व्हेस्टमेंट बँकर जीन गुडइनफ याला आयुष्याचा साथीदार म्हणून निवडले. प्रितीने अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१६मध्ये भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले.

* रीना रॉय

पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खान आणि रीना रॉय यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा त्यांच्या लग्नाअगोदर प्रचंड रंगल्या होत्या. मोहसिन आणि रीना यांनी एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर लग्न केले. मोहसिन यांनी रीना यांच्यासोबत लग्न केल्यानंतर क्रिकेट सोडून चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली.

* सेलिना जेटली
 बॉलिवूडमध्ये तिच्या अदांनी जलवा पसरवणारी अभिनेत्री म्हणजे सेलिना हिलाही तिचे पहिले प्रेम देशाच्या बॉर्डरच्या बाहेरच मिळाले. तिने २०११ मध्ये बिझनेसमॅन पीटर हॉग यांच्यासोबत लग्न केले. लग्नानंतर सेलिनाने चित्रपटात काम करणे सोडून दिले.

Web Title: 'These' foreign actresses fall in love with foreign celebrities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.