'खुबसुरत'मध्ये सोनमसोबत काम करण्यास कोणताही अभिनेता नव्हता तयार, त्यामागचं हे आहे Reason
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 16:02 IST2019-06-29T16:01:36+5:302019-06-29T16:02:05+5:30
अभिनेत्री सोनम कपूरने एका मुलाखतीत सांगितलं की खुबसुरत चित्रपटात काम करण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हता.

'खुबसुरत'मध्ये सोनमसोबत काम करण्यास कोणताही अभिनेता नव्हता तयार, त्यामागचं हे आहे Reason
अभिनेत्री सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपलं स्थान केलं. बॉलिवूडमध्ये तिच्या फॅशन आयकॉन म्हणून पाहिलं जातं. नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितलं की खुबसुरत चित्रपटात काम करण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हता.
सोनम कपूर हिने नुकतंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तिच्या कारकीर्दीबद्दल सांगितलं. यावेळी ती म्हणाली की, खुबसूरत चित्रपटात काम करण्यासाठी कोणताही अभिनेता तयार नव्हतं. चित्रपटाचं नाव खुबसूरत असं असल्यामुळे अनेक अभिनेत्यांनी या चित्रपटाला नकार दिला होता.
अभिनेत्यांनी नकार दिल्यामुळे पाकिस्तानी कलाकार फवाद खानला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि आता पाहा, फवाद एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता आहे. या चित्रपटानंतर त्याच्या आत्मविश्वासात दुणावला असल्याचं सोनम म्हणाली.
बॉलिवूडमध्ये माझे पदार्पण झाल्यानंतर अनेकांनी घराणेशाहीमुळे मला ही संधी मिळाल्याचं म्हणत ट्रोल केलं. मात्र त्यांना हे माहित नव्हतं की, मी सावरियाँसाठी ऑडिशन दिलं होतं. इतकंच नाही तर ‘दिल्ली ६’ असो किंवा आतापर्यंत केलेला कोणताही चित्रपट मी प्रत्येकासाठी ऑडिशन दिलं असल्याचं सोनमनं यावेळी सांगितलं.
सोनम लवकरच द जोया फॅक्टर चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.