गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 15:17 IST2023-12-25T15:17:00+5:302023-12-25T15:17:41+5:30

गेल्या वर्षभरापासून चाहते राहाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले होते.

The wait for fans is finally over; Ranbir-Alia's 'Raaha' came before the media for the first time | गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

गुबगुबीत गाल, निळेशार डोळे..; पहिल्यांदाच मीडियासमोर आली रणबीर-आलियाची 'राहा'...

Ranbir-Alia: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भटचे (Ranbir Kapoor Alia Bhatt) चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. गेल्या एक वर्षापासून चाहत्यांना रणबीर आणि आलियाची मुलगी राहा, हिला पाहायचे होते, पण रणबीर-आलियाने आतापर्यंत तिला मीडिया समोर आणले नव्हते. आता अखेर ख्रिसमसच्या निमित्ताने पहिल्यांदाच राहा मीडियासमोर आली. 

ख्रिसमसच्या निमित्ताने चाहत्यांना एक खास सरप्राईज मिळाले आहे. आलिया आणि रणबीर आई-वडील झाल्यानंतर चाहत्यांना खूप आनंद झाला होता, पण या पॉवर कपलने राहाच्या जन्माला एक वर्ष उलटूनही तिला मीडियासमोर आणले नव्हते. आता अखेर ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर या कपलने राहाला रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या क्यूट राहाला मीडियारमोर आणले. 

पहिल्यांदाच राहाचा गोंडस चेहरा पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टी मोडमध्ये दिसते. यावेळी राहा रणबीरच्या कडेवर बसलेली दिसली. राहाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेस घातला होता. राहाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, तिचे निळेशार डोळे. तिचे डोळे, द ग्रेट शोमॅन आणि राहाचे पणजोबा राज कपूर यांची आठवण करून देतात.

Web Title: The wait for fans is finally over; Ranbir-Alia's 'Raaha' came before the media for the first time