"या खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नका" विकी-कतरिनाच्या 'गूड न्यूज' पोस्टवर सलमानची कमेंट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:00 IST2025-11-11T11:57:18+5:302025-11-11T12:00:45+5:30
सलमाननच्या कमेंटच्या व्हायरल स्क्रीनशॉट खरा की खोटा? जाणून घ्या...

"या खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नका" विकी-कतरिनाच्या 'गूड न्यूज' पोस्टवर सलमानची कमेंट?
Salman Khan Comment On Katrina Vicky Post Truth: बॉलिवूडची लोकप्रिय जोडी कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. ७ नोव्हेंबर रोजी या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना मुलगा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. या घोषणेनंतर चाहत्यांसह प्रियंका चोप्रा, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कतरिना आणि विकीने ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर, सोशल मीडियावर एका कथित पोस्टचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या स्क्रीनशॉटमध्ये दावा करण्यात आला होता की, कतरिनाचा EX आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) याने त्यांच्या पोस्टवर एक कमेंट केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये दावा करण्यात आला आहे की, सलमान खाननं कमेंट करत लिहिलंय की, "या सर्व खाजगी गोष्टी इंटरनेटवर टाकू नका..." (ये सब प्राइवेट चीजें इंटरनेट पे मत डाला करो यार...). हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये ही कमेंट खरी आहे की खोटी, याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली. हा व्हायरल झालेला स्क्रीनशॉट पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. खरं तर सलमान खानने विकी आणि कतरिनाच्या पोस्टवर सार्वजनिकपणे कोणतीही कमेंट केलेली नाही.
— Aditi (@aditiraaaj1) November 8, 2025
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये अतिशय खासगी आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. या जोडप्याने डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. ज्याप्रमाणे त्यांनी आपले डेटिंग लाईफ लपवून ठेवले होते, त्याचप्रमाणे त्यांनी प्रेग्नेंसी देखील लाइमलाइटपासून दूर ठेवली होती. त्यांनी सप्टेंबर महिन्यातच गरोदरपणाची घोषणा केली होती. आता चाहत्यांना त्यांच्या बाळाचे नाव आणि फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे.