आग लागली नाही तर लावली? 'द साबरमती रिपोर्ट'चा थरारक टिझर, विक्रांत मेस्सीचा जबरदस्त अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:45 IST2024-03-28T15:44:28+5:302024-03-28T15:45:08+5:30
विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असलेल्या 'द साबरमती रिपोर्ट'चा भन्नाट टिझर रिलीज झालाय. हा सिनेमा सत्य समोर आणण्याची शक्यता आहे

आग लागली नाही तर लावली? 'द साबरमती रिपोर्ट'चा थरारक टिझर, विक्रांत मेस्सीचा जबरदस्त अभिनय
12th फेल नंतर विक्रांतच्या आगामी सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विक्रांतचा आगामी सिनेमा हा सत्य घटनेवर आधारीत आहे. सिनेमाचं नाव 'द साबरमती रिपोर्ट'. विक्रात मेस्सीची प्रमुख भूमिका असलेला 'द साबरमती रिपोर्ट'चा टिझर भेटीला आलाय. टिझरमधून 12th फेल नंतर पुन्हा एकदा विक्रांत मेस्सीचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळतेय. गोध्रा कांडवर आधारीत या सिनेमाचा टिझर उत्कंठावर्धक आहे.
'द साबरमती रिपोर्ट'मध्ये विक्रांत एका हिंदी पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे, जो साबरमती घटनेबाबत देशासमोर वस्तुस्थिती मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. 'द साबरमती रिपोर्ट'च्या टिझरमध्ये विक्रांत भारतातील हिंदी भाषिक व्यक्ती म्हणून स्वतःची गणना व्हावी म्हणून कठोर संघर्ष करताना दिसतोय. इंग्रजी भाषेचं वर्चस्व विक्रांत खोडू पाहतोय.
'द साबरमती रिपोर्ट'च्या टिझरमध्ये साबरमती एक्सप्रेस ट्रेनला आग लागली की लावली? हा मोठा प्रश्न उपस्थित केला गेलाय. सिनेमाचा टिझर दमदार आहे. एकता कपूरने सिनेमाची निर्मिती केलीय. 'द साबरमती रिपोर्ट'मध्ये विक्रांत मेस्सी प्रमुख भूमिकेत असून रिद्धी डोग्रा, राशी खन्ना या अभिनेत्रीही पाहायला मिळत आहे. ३ मे २०२४ ला सिनेमा लोकांच्या भेटीला येतोय.