तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण आलं समोर, या सुपरस्टारने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 12:36 IST2025-04-14T12:35:50+5:302025-04-14T12:36:46+5:30

Tamannaah Bhatia-Vijay Varma : तमन्ना भाटिया-विजय वर्मा यांच्या ब्रेकअपचं खरं कारण आलं समोर

The reason for Tamannaah Bhatia-Vijay Varma's breakup came to light, this is the advice given by this superstar to the actress | तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण आलं समोर, या सुपरस्टारने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला

तमन्ना भाटिया-विजय वर्माच्या ब्रेकअपचं कारण आलं समोर, या सुपरस्टारने अभिनेत्रीला दिलेला हा सल्ला

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) तिच्या व्यावसायिक लाइफशिवाय खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. विजय (Vijay Varma) सोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येणाऱ्या तमन्नाचे त्याच्यासोबत ब्रेकअप झालंय. त्यानंतर लोक त्यांच्या ब्रेकअपच्या कारणाबद्दल तर्कवितर्क लावत होते. पण आता त्याचे खरे कारणही समोर आले आहे. 

अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांची जोडी लोकांना आवडली. असे म्हटले जात होते की दोघांनीही २०२४ किंवा २०२५ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला तमन्नाचे वडील या नात्यावर खूश नव्हते, परंतु त्यांच्या मुलीच्या आनंदासाठी त्यांनी त्यांना मान्यता दिली. पण नंतर तमन्नाने अचानक लग्नातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा तिच्या वडिलांनी कारण विचारले तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, आता तिला विजयशी लग्न करायचे नाही. खरंतर, एका मीडिया रिपोर्टमध्ये हे उघड झाले आहे की तमन्ना भाटियाने हे कोणाच्या सल्ल्याने ब्रेकअप केले.

साउथच्या या सुपरस्टारने दिला सल्ला

असं सांगितलं जातंय की, तमन्नाला वाटू लागलं की विजय आता पूर्वीसारखा वचनबद्ध राहिलेला नाही. इतकेच नाही तर ती वारंवार सार्वजनिक ठिकाणी येण्यामुळे नाराज होती. तमन्नाने तिच्या पालकांना हे देखील सांगितले की ती केवळ विजयच्या विनंतीवरूनच मीडियामध्ये येत आहे. तमन्नाचा फॅमिली फ्रेंड आणि सुपरस्टार चिरंजीवी यांनी तिला स्वतः मीडियासमोर येऊन तिच्या ब्रेकअपबद्दल सांगण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे अफवांना पूर्णविराम मिळेल आणि चाहत्यांनाही सत्य कळेल. मात्र अभिनेत्रीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.


वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तमन्ना भाटिया शेवटची सिकंदर का मुकद्दरमध्ये दिसली होती. ती लवकरच ओडेला २ मध्ये दिसणार आहे. हा तेलुगू भाषेतील चित्रपट अशोक तेजा यांनी दिग्दर्शित केला आहे. अलीकडेच त्याचा टीझरही रिलीज केलाय. या चित्रपटात हेबा पटेल, वशिष्ठ एन. सिम्हा आणि नागा महेश सारखे कलाकार दिसतील.

Web Title: The reason for Tamannaah Bhatia-Vijay Varma's breakup came to light, this is the advice given by this superstar to the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.