शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोणच्या तब्येत बिघडण्यामागचे कारण आले समोर, वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 19:45 IST2022-06-20T17:50:55+5:302022-06-20T19:45:09+5:30
दीपिका पादुकोण अभिनेता प्रभाससोबत हैदराबादमध्ये आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना तिची अचानक तब्येत बिघडली होती आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं.

शूटिंग दरम्यान दीपिका पादुकोणच्या तब्येत बिघडण्यामागचे कारण आले समोर, वाचून व्हाल हैराण
काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणबद्दल बातमी आली होती की, अमिताभ बच्चनसोबत हैदराबादमध्ये तिच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाच्या सेटवर शूटिंग करत असताना तिची तब्येत बिघडली होती. यानंतर दीपिकाला रुग्णालयात नेण्यात आले. ही बातमी ऐकून चाहते खूपच नाराज झाले. दरम्यान, आता दीपिकाच्या फिल्म प्रोजेक्टच्या निर्मात्या अश्विनी दत्त यांनी दीपिकाच्या प्रकृतीबाबत स्टेटमेंट दिलं आहे. तब्येत बिघडल्यामुळे दीपिका हॉस्पिटलमध्ये गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी दत्त यांनी दीपिकाच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यामागचे खरं कारण सांगितले आहे.
का गेली होती हॉस्पिटलमध्ये
अश्विनी म्हणाल्या की, दीपिका हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत असून तिची प्रकृती ठीक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, दीपिकाची तब्येत बिघडली नाही, परंतु अभिनेत्री नुकतीच कोविडमधून बरी झाल्याने ती रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती.दीपिका कोविड बरा झाल्यानंतर युरोपला गेली होती. तिथून ती थेट आमच्या सेटवर आली. बीपी थोडं वर खाली झाल्यानं, दीपिका चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती.
दीपिकाचे आगामी सिनेमे दीपिका आगामी काळात अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. प्रोजेक्ट केमध्ये ती प्रभाससोबत, फायटरमध्ये हृतिक रोशन आणि पठाणमध्ये शाहरुख खानसोबत दिसणार आहे. ती पहिल्यांदाच हृतिकसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तिने याआधी शाहरुख खानसोबत तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे. शाहरुख आणि दीपिकाचा हा चौथा चित्रपट असेल.