Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा हिऱ्यांचा नेकलेस, लाखात नाही तर कोटीत आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 04:57 PM2024-05-23T16:57:02+5:302024-05-23T16:57:25+5:30

या हाराची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.

The Necklace Priyanka Chopra Wore To This Rome Event Costs $ 43 Million: Report | Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा हिऱ्यांचा नेकलेस, लाखात नाही तर कोटीत आहे किंमत

Priyanka Chopra : तुमच्या 10 पिढ्यांना पुरेल एवढ्या किमतीचा 'देसी गर्ल'चा हिऱ्यांचा नेकलेस, लाखात नाही तर कोटीत आहे किंमत

दागिने पाहून अनेकदा प्रश्न पडतो की, ज्वेलरी किंमत नक्की किती असावी. कोट्यवधींच्या घरात असली तरी नेमकी किती असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अलिकडेच ग्लोबल स्टार प्रियंकाच चोप्रा बुल्गारी इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. प्रियंका ही एक खरी फॅशनिस्टा आहे. तिची प्रत्येक गोष्ट ही खास असते. या सोहळ्यातील तिनं परिधान केलेले नेकलेस चर्चेचा विषय ठरला आहे. या हाराची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे.

बुल्गारी इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रानं क्रीम अँड ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये एन्ट्री घेतली. यावेळी तिच्या गळ्यात अतिशय महागडा डायमंड नेकलेस घातलेला दिसला. हा 'Bvlgari' ब्रँडचा सर्वात महागडा नेकपीस आहे. हा अप्रतिम दागिना बनवण्यासाठी 2 हजार 800 तास लागले. ज्यामुळे तो ब्रँडचा सर्वात महागडा नेकलेस बनला आहे. या नेकपीसमध्ये ७ हिरे आहेत. 200 कॅरेट हिऱ्यांचा समावेश असलेला या सुंदर नेकलेसची किंमत 43 मिलियन डॉलर अर्थात 358 कोटी रुपये आहे. सध्या या महागड्या नेकलेसची तुफान चर्चा रंगली आहे.

प्रियंका ही सर्वाधिक महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  प्रियंका आज कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीन आहे आणि अगदी रॉयल आयुष्य जगते. ती बॉलिवूडची पहिली अभिनेत्री आहे, जिच्याकडे रॉल्स रॉयल्स लक्झरी कार आहे. प्रियंका चोप्राकडेही अनेक आलिशान घरे आहेत, अभिनेत्रीकडे मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंत आलिशान बंगले आहेत.  प्रियंकाने आज तिच्या कारकिर्दीत जो काही टप्पा गाठला आहे, तो तिने स्वतःच्या मेहनतीवर गाठला आहे.

Web Title: The Necklace Priyanka Chopra Wore To This Rome Event Costs $ 43 Million: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.