बॉक्स ऑफिसवर 'The Kerla Story 2' हिट की फ्लॉप? एका आठवड्यात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 11:35 IST2026-03-07T11:25:46+5:302026-03-07T11:35:43+5:30

वादात सापडलेला 'द केरळ स्टोरी २' बॉक्स ऑफिसवर पास की फेल? कमावले फक्त...

the kerala story 2 movie box office collection day 7 know about total grossing | बॉक्स ऑफिसवर 'The Kerla Story 2' हिट की फ्लॉप? एका आठवड्यात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

बॉक्स ऑफिसवर 'The Kerla Story 2' हिट की फ्लॉप? एका आठवड्यात जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

The Kerala Story 2: साल २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरी सिनेमाचया भरघोस यशानंतर नुकताच त्याचा सीक्वल म्हणजे द केरळ स्टोरी २ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाला देखील रसिकांची तितकीच पसंती मिळताना दिसते आहे. प्रदर्शनापूर्वीच निर्माण झालेला वाद आणि अनेक कारणांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतो आहे. आता पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने किती कलेक्शन केलं आहे, याबद्दल जाणून घेऊया...

कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाची पहिल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत दबदबा निर्माण केला आहे. हा बहुचर्चित सिनेमा २७ फेब्रुवारीला रिलीज करण्यात आला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने ७५ लाख रुपयांची कमाई करत खातं उघडलं. आता रिलीजच्या सातव्या दिवशी या चित्रपटाने ₹२.१९ कोटींची कमाई केली आहे. ज्यामुळे चित्रपटाने आठवड्याभरात  २२.३४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'द केरळ स्टोरी २' बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?

विपुल शाह निर्मित, "द केरळ स्टोरी २" ने रिलीजच्या सात दिवसांतच त्याच्या बजेटच्या निम्म्याहून अधिक कमाई केली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट २८ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.यावरून चित्रपटाने बजेटच्या अंदाजे ८०% रक्कम वसूल केली आहे. चित्रपटाने एका आठवड्यात २२.३४ कोटींची कमाई करत हिट ठरला आहे. जर हाच वेग कायम राहिला तर सिनेमा लवकरच १०० कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

द केरळ स्टोरी २ चित्रपटाची कथा तीन मुलींभोवती गुंफण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. या तिन्ही अभिनेत्रींच्या संघर्षावर हे कथानक आधारलेलं आहे. 

Web Title : 'द केरला स्टोरी 2': हिट या फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शन

Web Summary : 'द केरला स्टोरी 2' ने पहले हफ्ते में ₹22.34 करोड़ कमाए। ₹28 करोड़ के बजट पर बनी इस फिल्म ने लगभग 80% लागत वसूल कर ली है, जिससे यह हिट हो गई है। फिल्म तीन महिलाओं के संघर्ष के चारों ओर घूमती है।

Web Title : 'The Kerala Story 2': Hit or Flop? Box Office Collection

Web Summary : 'The Kerala Story 2' earned ₹22.34 crore in its first week. Made on a budget of ₹28 crore, the film has recovered approximately 80% of its costs, making it a hit. The movie revolves around the struggles of three women.