The Gray Manचा प्रीमियरला धनुषचा देसी स्वॅग, ट्रेडिशनल लूकनं जिंकली चाहत्यांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:01 IST2022-07-21T18:51:33+5:302022-07-21T19:01:41+5:30
धनुषने पारंपारित अंदाजात हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. संपूर्ण प्रीमियरमध्ये तो आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला.

The Gray Manचा प्रीमियरला धनुषचा देसी स्वॅग, ट्रेडिशनल लूकनं जिंकली चाहत्यांची मनं
साऊथचा सुपरस्टार सध्या त्याचा आगामी हॉलिवूड प्रोजेक्ट 'द ग्रे मॅन'ला घेऊन चर्चेत आहे. लंडननंतर 'द ग्रे मॅन'चा प्रीमियर आता मुंबईत झाला. हॉलिवूडसह बॉलिवूड कलाकरांनी या प्रीमियरला हजेरी लावली होती. धनुषने पारंपारित अंदाजात हजेरी लावत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. धनुषने भारतीय पारंपारिक पोशाखात दिसला. हॉलिवूड स्टार्समध्ये, धनुष त्याच्या लुंगीच्या पारंपारिक पोशाखात दिसला आणि संपूर्ण प्रीमियरमध्ये तो आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. सध्या त्याचा धनुषचा हा लूक बराच व्हायरल होतोय.
साऊथचा सुपरस्टार धनुषचा लुंगीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत राहिला. धनुषनं पारंपारिक दक्षिण भारतीय पोशाखाला प्राधान्य दिलं. धनुषचा हा ट्रेडिशनल लूकने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
'द ग्रे मॅन'च्या प्रीमियरचे बरेच फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यामध्ये विकी कौशल ते आश्रम फेम अदिती पोहनकर, 'द ग्रे मॅन'चे दिग्दर्शक जो रुसो यांच्यासह अनेक बड्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. 'द ग्रे मॅन'च्या मुंबई प्रीमियरमधील फोटो आणि व्हिडिओ येथे आहेत.
याआधी धनुष 'द ग्रे मॅन' चित्रपटाच्या प्रीमियरसाठी लंडनला पोहोचला होता. यावेळी त्यांची दोन्ही मुले लिंग आणि यात्रा यांनाही दिसले. धनुषने स्वत: सोशल मीडियावर आपल्या मुलांसोबतचा फोटो शेअर करताना याबाबत माहिती दिली होती.
'द ग्रे मॅन' हा चित्रपट नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा चित्रपट आहे. तो अमेरिकेतील काही चित्रपटगृहांमध्ये वीकेंडला रिलीज झाला आहे. जेम्स बाँड आणि मिशन इम्पॉसिबल प्रमाणे ही स्पाय फ्रँचायझी तयार आल्याचे समजते. 'द ग्रे मॅन' सोबत ही गुप्तचर फ्रेंचायझी वाढवण्याची रुसो ब्रदर्सचा प्लान असल्याचे सांगितले जात आहे. जर हा चित्रपट हिट झाला तर पुढे ग्रे मॅन युनिव्हर्सचे चित्रपट आणि टीव्ही मालिका येतील. आतापर्यंत हा चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना धनुषचा अभिनय खूप आवडला आहे. दुसरीकडे, धनुषच्या कामाचे त्याचे सहकलाकार रायन आणि रेगे यांनीही कौतुक केले आहे.