'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:00 IST2023-01-11T16:59:22+5:302023-01-11T17:00:12+5:30
Pathaan Movie : शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमच्या पठाणचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मात्र दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने या चित्रपटासंदर्भात नवीन खुलासा केला आहे.

'पठाण'च्या दिग्दर्शकाने केला अॅक्शन सीनबदल खुलासा, म्हणाला- 'चित्रपटातील दमदार...'
शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'पठाण'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. यशराज फिल्म्सचा अॅक्शन थ्रिलर पठाण हा आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी स्पाय युनिव्हर्सचा एक भाग आहे आणि त्यात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद भारावला आहे. नुकतेच त्याने चित्रपटातील अप्रतिम क्षण अद्याप शेअर केलेले नाहीत आणि ते चित्रपट रिलीज झाल्यावर पाहायला मिळणार असल्याचा खुलासा केला आहे.
पठाणचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणाला की, 'पठाणचा ट्रेलर बनवणे हे एक मोठे आव्हान होते कारण त्याचा टीझर आणि 'बेशरम रंग' आणि 'झूम जो पठाण' या दोन गाण्यांनी चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा वाढवल्या होत्या. आम्ही अगदी स्पष्ट होतो की आम्ही असा ट्रेलर बनवू ज्याने आता चित्रपटाला मिळणारी चर्चा आणि प्रसिद्धी वाढेल. आम्ही अतिशय काळजीपूर्वक आणि धोरणात्मकपणे एक ट्रेलर तयार केला आहे जो प्रेक्षकांना पठाणच्या काही सर्वोत्तम क्षणांची झलक दाखवतो. तरीही पठाण कोणत्या विशिष्ट उत्कृष्ट दृश्यांमध्ये दिसणार आहे, याबद्दल कोणतेही संकेत दिलेले नाहीत. जो खऱ्या अर्थाने अॅक्शनपट बनवतो. मला खूप आनंद होत आहे की चित्रपटाबद्दल जास्त काही न सांगता, आम्ही एक ट्रेलर बनवला आहे ज्याचे सर्वांनी कौतुक केले आहे.
सिद्धार्थ आनंद सांगतो की, 'हा फक्त ट्रेलर आहे, पठाण कोणत्या स्केलवर बनला आहे, हे समजून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल. आम्ही जगभरातील भारतीयांचे मनोरंजन करू इच्छितो. त्यांना अभिमान वाटेल की आम्ही एक असा चित्रपट बनवला आहे जो कोणत्याही आंतरराष्ट्रीय अॅक्शन एंटरटेनरशी स्पर्धा करू शकतो. यशराज फिल्म्सचा थ्रिलर पठाण २५ जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होणार आहे.