प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 14:49 IST2025-02-26T14:48:37+5:302025-02-26T14:49:26+5:30
'द भूतनी' असं या सिनेमाचं नाव असून नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित करण्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित
'स्त्री २', 'मुंज्या', 'भुलभूलैय्या ३' नंतर आता आणखी एक हॉरर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'द भूतनी' असं या सिनेमाचं नाव असून नुकतंच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित करण्याबरोबरच सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.
सिनेमाच्या टीझरची सुरुवात एका मंत्राने होत असल्याचं दिसत आहे. टीझरच्या सुरुवातीलाच भुतनीची झलक पाहायला मिळत आहे. तर तिने तिच्यामुळे झालेला तांडवही टीझरमध्ये दिसत आहे. "गीता मे लिखा है आत्मा अमर है अजर है शरीर के नष्ट होने पर भी इसका नाश नही होता" असा डायलॉगही बॅकग्राऊंडला ऐकायला मिळत आहे. काही अॅक्शन सीन्सही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत.
'द भूतनी' सिनेमात मौनी रॉय भूतनीच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात पलक तिवारी, सनी सिंग यांच्या मुख्य भूमिका आहेत. संजय दत्तही सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून सोशल मिडिया स्टार निकदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धांत सचदेव यांनी केलं आहे. तर संजय दत्तने सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या १८ एप्रिलला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.