'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता अडकला विवाहबंधनात; पत्नीसोबतचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:24 IST2025-12-10T10:57:41+5:302025-12-10T11:24:51+5:30
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता मेहरझान माझदा विवाहबंधनात अडकला आहे.

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता अडकला विवाहबंधनात; पत्नीसोबतचा फोटो केला शेअर
सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' अभिनेता मेहरझान माझदा विवाहबंधनात अडकला आहे. आपल्या मैत्रिणीसोबत त्याने लग्नगाठ बांधली. मेहरझान माझदानं 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये जिजीभाईची भूमिका साकारली होती.
मेहरझान माझदाच्या पत्नीचं नाव नाओमी फेलफेली असं आहे. नाओमी आणि मेहरझान यांनी पारसी पद्धतीने लग्न केलं. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या रोमँटिक फोटोमध्ये मेहरझान आपल्या पत्नीच्या कपाळावर प्रेमाने किस करताना दिसत आहे. फोटोसोबत मेहरझानने कॅप्शनमध्ये लिहिलं, "मी खूप आनंदी आहे की मी तो पहिला मेसेज पाठवला... मिसेस माझदा!" या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी कमेंटक करत नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
मेहरझानची पत्नी नाओमी ही इंडो-इराणी वंशाची आहे. ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसून आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य देते. मेहरझान माझदानं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'शॉर्टकट रोमियो', 'बुलेट्स', 'ब्रोकन बट ब्युटीफुल', 'मॉडर्न लव्ह मुंबई', 'ढाई किलो प्रेम' आणि 'दास्तान-ए-मोहब्बत: सलीम अनारकली' यामध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे 'ढाई किलो प्रेम' मालिकेसाठी त्यानं वजन वाढवले होते आणि नंतर निरोगी पद्धतीने वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकितही केलं होतं.