'द आर्चीज' स्टार डॉट उर्फ अदिती सैगलचा मोठ्या पडद्यावर डेब्यू, 'डेसिबल'मध्ये मुख्य भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:05 IST2025-03-20T18:05:16+5:302025-03-20T18:05:30+5:30
'द आर्चीज' फेम गायिका-अभिनेत्री डॉट उर्फ अदिती सैगल तिच्या थ्रिलर चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

'द आर्चीज' स्टार डॉट उर्फ अदिती सैगलचा मोठ्या पडद्यावर डेब्यू, 'डेसिबल'मध्ये मुख्य भूमिका
'द आर्चीज'मधील 'एथेल'च्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मल्टी-टॅलेंटेड कलाकार डॉट उर्फ अदिती सैगल आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. विनीत जोशी दिग्दर्शित आणि विन जोस प्रोडक्शन्स निर्मित 'डेसिबल' या साय-फाय थ्रिलर चित्रपटात डॉट झळकणार आहे. या चित्रपटात डॉटसोबत अभिनेता सनी सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
एका छोट्याशा शांत गावात घडणारी 'डेसिबल' सिनेमाची कथा विज्ञान आणि मानवी नातेसंबंध यांची सांगड घालणारी आहे. हा साय-फाय थ्रिलर प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना डॉट म्हणाली,"संगीतकार असल्यामुळे आवाज माझ्यासाठी आधीपासूनच खूप खास आहे. जेव्हा मला 'डेसिबल'च्या कथेबद्दल कळलं, की ज्यात आवाजाच्या माध्यमातून भूतकाळ उलगडला जातो, तेव्हा मला हा विषय खूपच वेगळा वाटला. यात मिस्ट्री आणि एक जबरदस्त ड्रामा आहे. कथा खूपच इंटेन्स आहे आणि प्रेक्षकांनी हा अनुभव घ्यावा असं वाटतं".
साउंड डिझाईन, तंत्रज्ञान, नातेसंबंध आणि थरार यांचा मिलाफ असलेली 'डेसिबल' हा चित्रपट डॉटच्या करिअरला एक वेगळं वळण देणारा ठरणार आहे. अभिनेत्रीच्या नव्या चित्रपटाबद्दल कळताच तिचे चाहते खूश झाले आहेत.