दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 10:25 IST2018-12-04T10:17:35+5:302018-12-04T10:25:16+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती

Thats why ranbir -alia cant attend Deepveer reception | दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया

दीपवीरच्या रिसेप्शन पार्टीत या कारणामुळे आले नाहीत रणबीर-आलिया

ठळक मुद्दे रणबीरची प्रेजेंट गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि दीपिकाचे देखील चांगले बॉडिंग आहेरणबीरची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफने देखील पार्टी एन्जॉय केली

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. दीपवीरच्या पार्टीत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र काहीशी निराशा झाली.
रणबीर कपूर दीपिकाचा एक्स होता तरीही दोघांमध्ये आज चांगले मैत्रिचे नातं आहे. ऐवढेच नाहीत तर रणबीरची प्रेजेंट गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि दीपिकाचे देखील चांगले बॉडिंग आहे. ऐवढे सगळं असताना देखील ही जोडी पार्टीला आली नाही त्यामुळे अनेक चर्चा यावर रंगल्या. आलिया -रणबीरने पार्टी न येण्या मागचे कारण समोर येते आहे.   


रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलिया सध्या 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. दीपवीरने दिलेल्या पार्टीच्या आधी आलिया-रणबीरने जवळपास 20 तास शूटिंग केले होते. त्यामुळे पार्टीला येण्यासाठी त्यांच्यात ताकत उरली नव्हती म्हणून ते आले नाहीत. मात्र आलियाची आई सोनी राजदान या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. रणबीरची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफने देखील पार्टी एन्जॉय केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, लव रंजनच्या आगामी चित्रपटासाठी रणबीर कपूरची निवड करण्यात आली आहे आणि या सिनेमातील नायिकेच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारण्यात आले आहे. दीपिका स्क्रिप्ट ऐकली आहे. मात्र अद्याप तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिलेला नाही. जर तिने होकार दिला तर ते दोघे पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकताना दिसतील. 

 

Web Title: Thats why ranbir -alia cant attend Deepveer reception