Thamma Box Office Collection: आयुषमान-रश्मिकाच्या 'थामा'ने पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:46 IST2025-10-22T13:44:54+5:302025-10-22T13:46:06+5:30
आयुषमान खुराना रश्मिका मंदानाच्या थामा सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर

Thamma Box Office Collection: आयुषमान-रश्मिकाच्या 'थामा'ने पहिल्याच दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई
दिवाळीच्या सुट्ट्यांचा फायदा घेत प्रदर्शित झालेल्या दोन प्रमुख बॉलिवूड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खणखणीत यश मिळवले आहे. आयुषमान खुराना, रश्मिका मंदाना, आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेला 'थामा' (Thamma) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार कमाई करत सर्वांना चकित केलं आहे, तर हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने की दीवानियत' (Ek Deewane Ki Deewaniyat) या रोमँटिक चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
'थामा'ची ऐतिहासिक ओपनिंग
'Sacnilk' च्या आकडेवारीनुसार, 'थामा' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २४.२५ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. यात हिंदीतून २४ कोटी आणि तेलुगू आवृत्तीतून २५ लाख कमाईचा समावेश आहे. चित्रपटाला देशभरात सुमारे ५००० स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आलं होते. विशेष म्हणजे, या ओपनिंगमुळे आयुषमान खुरानाला त्याच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सुरुवात मिळवून दिली आहे. यामुळे तो पहिल्यांदाच २० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ओपनिंग चित्रपटांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
या मजबूत कमाईमुळे 'थामा'ने २०२५ मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांच्या यादीत थेट टॉप ५ मध्ये स्थान मिळवलं आहे. एकंदरीत, दिवाळीच्या सुट्ट्या आणि सणासुदीच्या वातावरणाचा फायदा 'थामा' सिनेमाला मिळाला आहे. दुसरीकडे हर्षवर्धन राणेच्या 'एक दीवाने की दीवानियत' या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी चांगली असल्याने हा सिनेमाही चांगली कमाई करत आहे. 'थामा' सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात आयुषमान, रश्मिका पहिल्यांदाच एकत्र काम करत असून नवाझुद्दीन सिद्दीकी खलनायकाची भूमिका साकरतोय. सिनेमात वरुण धवनचा कॅमिओ रोलही आहे.