१०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार धनुष-क्रितीचा 'तेरे इश्क में'? जाणून घ्या सिनेमाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:38 IST2025-12-04T12:37:42+5:302025-12-04T12:38:24+5:30
धनुष आणि क्रिती सेनॉनचा तेरे इश्क में सिनेमाने सहा दिवसात चांगली कमाई केली आहे. जाणून घ्या सिनेमाची कमाई

१०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार धनुष-क्रितीचा 'तेरे इश्क में'? जाणून घ्या सिनेमाची कमाई
धनुष आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला 'तेरे इश्क में' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. 'तेरे इश्क में'ची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. अशातच 'तेरे इश्क में' सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढत आहे. सिनेमाने गेल्या सहा दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इतकंच नव्हे हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या.
'तेरे इश्क में' सिनेमाने किती पैसे कमावले?
प्रेक्षक आणि समीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या आधारे 'तेरे इश्क में' सिनेमाने तिकिट खिडकीवर भरघोस कमाई केली आहे. क्रिती-धनुषच्या या हृदयस्पर्शी कहाणीने पहिल्या दिवशी १६ कोटींची कमाई केली. परंतु नंतर मात्र कमाईत चांगलीच घट झाली. तरीही पाचव्या दिवशी 'तेरे इश्क में' सिनेमाने १०.२५ कोटींची कमाई केली. सिनेमाने सहाव्या दिवशी बुधवारी ६.७५ कोटींची कमाई केली. त्यामुळे सहा दिवसांमध्ये 'तेरे इश्क में' सिनेमाने एकूण ७६.७५ कोटींची कमाई केली. लवकरच हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री घेण्याची शक्यता आहे.
'तेरे इश्क में' सिनेमाला येणाऱ्या आठवड्यात रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाचं तगडं आव्हान आहे. हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून 'तेरे इश्क में' सिनेमाला 'धुरंधर' सिनेमाशी स्पर्धा करावी लागेल. 'धुरंधर' सिनेमा रिलीज झाल्यामुळे 'तेरे इश्क में' सिनेमाचे शो सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. 'तेरे इश्क में' सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास, या सिनेमात धनुष, क्रिती सेनन, मोहम्मद झिशान अय्यूब, प्रकाश राज या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल राय यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.