तापसी पन्नूने बिजली गिरेगी या गाण्यावर धरला ताल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:39 IST2018-08-25T21:34:38+5:302018-08-25T21:39:16+5:30
बिजली गिरेगी या गाण्यावर तापसी पन्नूने ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत होती.

तापसी पन्नूने बिजली गिरेगी या गाण्यावर धरला ताल
अभिनेता अभिषेक बच्चन, तापसी पन्नू यांच्या आगामी 'मनमर्जिया' सिनेमाची धमाकेदार म्युझिकल टूर नागपूरमध्ये मनकापूर इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असून लोकमतने आयोजित केली आहे. मनमर्जियां या चित्रपटातील बिजली गिरेगी हे गाणं रसिकांच्या ओठी रुळलेले आहे. हेच गाणे गायक गात असताना स्टेजवर तापसी पन्नूची एन्ट्री झाली. तिने या गाण्यावर ताल धरलेला पाहताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत तिला साथ दिली. काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये ती खूपच छान दिसत होती.
तापसीने हॅलो नागपूर, क्या हाल है यार म्हणत उपस्थितांशी सवांद साधला. मी स्टेजवर येण्याआधी खूपच नर्व्हस होती असे तिने सांगितले. पण इतक्या संख्यने लोकांना पाहून एक वेगळाच उत्साह निर्माण झाला होता.
अभिनेता अभिषेक बच्चन, तापसी पन्नू यांच्या आगामी 'मनमर्जिया' सिनेमाची धमाकेदार म्युझिकल टूर नागपूरमध्ये मनकापूर इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असून लोकमतने आयोजित केली आहे. अमित त्रिवेदीने उडता पंजाब या चित्रपटातील गाण्याद्वारे कार्यक्रमाला सुरुवात केली. अमितच्या या गाण्याला लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर हर्षदीप कौर, भानू प्रताप सिंग यांनी 'मनमर्जिया' या चित्रपटातील गाणी सादर केली, उपस्थितांनी या गाण्यावर चांगलाच ताल धरला.
मनमर्जियां या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल नागपूरमध्ये दाखल झाले असून लोकमतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.