Tanushree Dutta controversy : डेजी शाह देणार तनुश्री दत्ताच्या बाजूने साक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 20:46 IST2018-10-11T20:45:30+5:302018-10-11T20:46:43+5:30
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे कळतेय.

Tanushree Dutta controversy : डेजी शाह देणार तनुश्री दत्ताच्या बाजूने साक्ष?
अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर एका गाण्याच्या शूटींगदरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले, असा आरोप तिने अलीकडे एका मुलाखतीत केला आणि या वादाला नव्याने तोंड फुटले. काल बुधवारी तनुश्रीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तिच्या या तक्रारीनंतर मुृंबईच्या ओशिवरा पोलिसांनी नाना पाटेकर , गणेश आचार्य यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. यावेळी तनुश्रीचा जबाबही नोंदवण्यात आला. या प्रकरणासंदर्भात एक ताजी माहिती समोर येते आहे. त्यानुसार, तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे कळतेय.
आता डेजी शाहचा या प्रकरणात कुठून आली,असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. डेजीने २०१४ मध्ये सलमानच्या ‘जय हो’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. मग २००८मध्ये ती ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर काय करत होती, असा विचार अनेकजण करत असतील. पण आम्ही सांगू इच्छितो की, त्या दिवशी ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर डेजी शाह हजर होती. अर्थात अभिनेत्री म्हणून नव्हे तर गणेश आचार्यची सहाय्यक म्हणून. होय, हिरोईन म्हणून डेब्यू करण्यापूर्वी डेजी डान्सर होती. ‘हॉर्न ओके प्लीज’मध्ये ती कोरिओग्राफर गणेश आचार्यला असिस्ट करत होती. हीच डेजी आता तनुश्रीची साक्षीदार म्हणून उभी राहणार असल्याचे वृत्त पिंकविलाने दिले आहे. रिहर्सलदरम्यान नानाचा स्पर्श तनुश्रीला कथितरित्या आवडला नव्हता. डेजीने याबाबत गणेश आचार्यकडे तक्रार केली होती. पण यावर काही कारवाई करण्याऐवजी गणेश आचार्यने तिला शांत बसण्याचा सल्ला दिला, असे कळते. आता हे सगळे डेजी पोलिसांसमक्ष सांगते का, हे लवकरच कळेल. सूत्रांच्या मते, लवकरच पोलिस या प्रकरणात डेजीचा जबाब नोंदवू शकतात.