राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'मध्ये तमन्नाच्या आयटम साँगचा तडका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 18:03 IST2023-12-12T18:03:14+5:302023-12-12T18:03:48+5:30
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या रजनीकांत यांच्या 'जेलर'मध्ये तमन्नावर चित्रीत झालेलं 'कावाला...' हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर आता ती 'स्त्री २'मध्ये आयटम साँग करताना दिसणार आहे.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या 'स्त्री २'मध्ये तमन्नाच्या आयटम साँगचा तडका
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'स्त्री' चित्रपटाचा सिक्वेल बनत असल्याचं सर्वांनाच माहित आहे. 'स्त्री २'मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता असतानाच यात तमन्ना भाटियाचं आयटम साँगही असेल अशी बातमी आली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या रजनीकांत यांच्या 'जेलर'मध्ये तमन्नावर चित्रीत झालेलं 'कावाला...' हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर आता ती 'स्त्री २'मध्ये आयटम साँग करताना दिसणार आहे.
२०१८मध्ये गाजलेल्या या हॅारर कॅामेडी सिक्वेलचं शूटिंग सध्या सुरू आहे. यात श्रद्धा कपूरसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार दिसणार आहेत. आता या टिममध्ये आयटम साँगकरीता का होईना पण तमन्नाचंही नाव जोडलं गेलं आहे. तमन्नासोबत या गाण्यात राजकुमार रावही दिसणार असून, या गाण्याच्या निमित्ताने दोघे प्रथमच स्क्रिन शेअर करणार आहेत. स्त्री २ पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तमन्ना भाटिया रिलेशनशीपमुळे असते चर्चेत
तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज २'मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसले, त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.