तमन्ना भाटियानं 'जी करदा'मधील आपल्या भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:03 IST2023-06-16T17:01:40+5:302023-06-16T17:03:55+5:30
'जी करदा' मधील तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करतायेत.

तमन्ना भाटियानं 'जी करदा'मधील आपल्या भूमिकेनं जिंकली प्रेक्षकांची मनं
तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) २०२३ मध्ये विविध प्रोजेक्टमध्ये व्यस्त असून ती अनेक आगामी प्रोजेक्ट करत आहे. 'जी करदा' ही तिची वेबसिरीज अमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नेहमीच वैविध्य पूर्ण भूमिका बजावणारी तमन्ना तिच्या या नव्या वेबसिरीजमध्ये वेगळी भूमिका साकारताना बघायला मिळते आहे. 'जी करदा' मधील तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षक कौतुक करतायेत.
ही वेबसीरिज बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते ज्यांना त्यांच्या ३०व्या वर्षी आपण विचार केला तसे जीवन नाही हे लक्षात येते. या वेब शो मध्ये तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, आणि सामवेदना सुवाल्का हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. या वेब शो मध्ये सिमोन सिंग आणि मल्हार ठकर देखील प्रमुख भूमिकेत दिसतायेत.
'जी करदा"नंतर तमन्ना नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज 2'मध्ये दिसणार आहे. यात काजोल, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, विजय वर्मा, मृणाल ठाकूर, अमृता सुभाषसह मोठी स्टारकास्ट आहे. यात विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची केमिस्ट्री दिसून येणार आहे. तमन्ना याशिवाय अनेक उत्साहवर्धक प्रोजेक्ट्स आहेत. मल्याळम चित्रपट “बांद्रा”, तेलुगुमध्ये “भोला शंकर” आणि तमिळमध्ये “जेलर" अशा अनेक चित्रपटात ती झळकणार आहे.