तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:24 IST2023-07-15T13:23:26+5:302023-07-15T13:24:20+5:30
Tamannaah Bhatia-Vijay Varma 'डार्लिंग्स' अभिनेता विजय वर्मा आणि 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.

तमन्ना-विजय वर्माचं अफेयर पब्लिसिटी स्टंट? समोर आलं दोघांच्या नात्यामागील सत्य
'डार्लिंग्स' अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि 'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया ( Tamannaah Bhatia) सध्या त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच दोघे 'लस्ट स्टोरेज २'मध्ये एकत्र दिसले होते, त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या काही वेळापूर्वीच दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर तमन्ना आणि विजयचे अफेअर हा पब्लिसिटी स्टंट आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. आता विजयने प्रश्नांची उत्तरे दिली आणि सत्य सांगितले.
जीक्यू इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विजय वर्माला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, आम्ही एकमेकांना डेट करत आहोत. दोघेही एकत्र खूप आनंदी आहेत. मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे. खलनायक म्हणून माझा काळ संपला आहे, आता मी रोमान्सच्या टप्प्यात आहे. याआधी, जेव्हा तमन्नाला तिच्या आणि विजयच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा चित्रपट प्रचारकाशी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती, 'मला वाटत नाही की तुम्ही कोणाकडे आकर्षित होऊ शकता कारण तो तुमचा को-स्टार आहे. मी अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. मला असे वाटते की जेव्हा तुम्हाला एखाद्यासाठी काहीतरी वाटते तेव्हा ते खूप वैयक्तिक असते. तो काय करतो याच्याशी प्रेमाचा काहीही संबंध नसतो... मला म्हणायचे आहे की प्रेम फक्त हे पाहून होत नाही.
लस्ट स्टोरीज २ पासून सुरू झाली लव्ह स्टोरी
तमन्ना आणि विजय वर्मा यांची लव्ह स्टोरी लस्ट स्टोरीज २मुळे फुलली. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे एकत्र आले आणि लवकरच त्यांनी त्यांच्या नात्याची पुष्टी केली. फिल्म कॅम्पेनरला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली, 'एक अशी व्यक्ती आहे ज्याची मी खूप काळजी घेते. ते माझे सुखाचे ठिकाण आहे.