'वेदा'साठी एकत्र आले तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:58 IST2023-07-18T17:58:16+5:302023-07-18T17:58:48+5:30
Tamannaah Bhatia and John Abraham : जॉन अब्राहमसोबत तमन्ना भाटिया पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे.

'वेदा'साठी एकत्र आले तमन्ना भाटिया आणि जॉन अब्राहम
तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) सध्या पॅन-इंडिया अभिनेत्री म्हणून टॉप लिस्टवर आहे. 'जी करदा'मधील तिच्या अभिनयामुळे ती चर्चेत आली. आता तिची आणखी एक बातमी आली आहे. 'वेदा' या चित्रपटात ती जॉन अब्राहम(John Abraham)सोबत दिसणार असल्याचे समजते आहे. या दोन कलाकारांना एका पडद्यावर पाहणे एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नसणार यात शंका नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार जॉन अब्राहमसोबततमन्ना भाटिया एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याबाबतच्या इतर गोष्टीही लवकरच समजतील. चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना प्रथमच जॅान आणि तमन्ना या नव्या जोडीची केमिस्ट्री अनुभवता येणार आहे. वेदाच्या शूटिंगला जोधपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटात तमन्ना आणि जॉनसोबत शर्वरी वाघदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
तमन्ना भाटिया म्हणाली की, निखिल आडवाणी ज्या प्रकारे त्याच्या कथा सांगतो त्याच्या त्या पद्धतीची मी नेहमीच चाहती आहे. त्याच्याकडे एक कौशल्य आहे आणि त्याची ही क्षमता खूप प्रेमळ आहे. जॉन आणि मला पहिल्यांदा एकत्र काम करण्याची संधी मिळाली. माझे पात्र कसे दिसते हे पाहणे निश्चितच रोमांचक असेल.
'कल हो ना हो', 'सलाम-ए-इश्क', 'डी-डे' आणि 'बाटला हाऊस' या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखले जाणारे आडवाणी म्हणाले की, भाटियाने अनेक "सनसनाटी कामगिरी" करून छाप सोडली. तो पुढे म्हणाला, जेव्हा मी या विशिष्ट भूमिकेसाठी तिच्याशी संपर्क साधला, तेव्हा मला आनंद झाला की तिने या चित्रपटासाठी माझ्या दृष्टीकोनवर लगेच विश्वास ठेवला. माझी टीम आणि मी तिच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत.
तमन्ना भाटियाकडे वेदा व्यतिरिक्त 'जेलर', 'भोला शंकर', 'वांद्रे' असे बरेच चित्रपट आहेत.