बापरे! लहानग्या तैमुरने उचलला सैफ अली खानवर हात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 16:15 IST2022-03-07T16:14:23+5:302022-03-07T16:15:15+5:30
Taimur ali khan: या व्हिडीओमध्ये तैमुर चिडला असून त्याने रागाच्या भरात सैफवर हात उचलला. परंतु, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.

बापरे! लहानग्या तैमुरने उचलला सैफ अली खानवर हात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क
सध्याच्या काळात कलाकारांपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडचीच सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगत असते. यात सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा लेक तैमुर तर लोकप्रिय स्टारकिडपैकी एक आहे. त्यामुळे तैमुर कुठेही दिसला तरीदेखील त्याची एक छबी कॅमेरात कैद करण्यासाठी चाहते, छायाचित्रकार पुढे सरसावतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे असंख्य व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच सध्या त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो चक्क सैफवर हात उचलताना दिसत आहे.
बॉलिवूडचं स्टार कपल करीना कपूर आणि सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात, पण आता त्यांचा लाडका मुलगा तैमूर अली खान सगळ्याचं लक्षवेधून घेत आहे.एका व्हिडिओमुळे तैमूरची खूप जास्त चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तैमुर चिडला असून त्याने रागाच्या भरात सैफवर हात उचलला. परंतु, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये सैफ आणि तैमुर त्यांच्या कारमधून खालती उतरतात. यावेळी सैफच्या हातात एक ग्लास असतो जो तैमुर उडी मारुन घेण्याचा प्रयत्न करतो. तैमुरची ही मस्ती पाहून सैफ त्याला आडवतो. ज्यामुळे चिडलेला तैमुर त्याच्यावर हात उचलतो. विशेष म्हणजे या व्हिडीओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी त्याला ट्रोल केलंय. तर काही जणांनी तो लहान आहे असं म्हणत त्याची बाजू घेतली आहे.