"लग्न नको फक्त बेडवर पुरूष..." तब्बू खरंच असं म्हणाली का? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 14:17 IST2026-01-20T14:16:33+5:302026-01-20T14:17:27+5:30

तब्बूच्या लग्नाबाबतच्या 'त्या' व्हायरल पोस्टचं सत्य काय?

Tabu Statement Marriage Just Want One Man In Bed Viral Know The Fact | "लग्न नको फक्त बेडवर पुरूष..." तब्बू खरंच असं म्हणाली का? जाणून घ्या सत्य

"लग्न नको फक्त बेडवर पुरूष..." तब्बू खरंच असं म्हणाली का? जाणून घ्या सत्य

Tabu Marriage Statement : बॉलिवूडची अत्यंत प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री तब्बू हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तब्बू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. वयाची ५४ वर्षे उलटल्यानंतरही अविवाहित असलेल्या तब्बूच्या नावाने एक स्टेटमेंट व्हायरल होत आहे. मात्र, या व्हायरल दाव्यामागचं सत्य आता समोर आले आहे.

सोशल मीडिया हँडल्सवर काही पोस्ट शेअर झाल्यात. या पोस्टमध्ये  दावा करण्यात आला आहे की, तब्बू म्हणाली, "मला सध्या लग्न करायचं नाही. मला फक्त झोपण्यासाठी एक पुरुष हवा आहे. मी माझं सिंगल आयुष्य एन्जॉय करत आहे". तब्बूच्या टीमने या प्रकरणाची गंभीर दखल घेत हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. टीमने स्पष्ट केले की, तब्बूने असे कोणतेही विधान केलेले नाही. सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही माहिती पूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. या विधानाचा कोणताही अधिकृत व्हिडीओ किंवा ऑडिओ पुरावा उपलब्ध नाही.

विशेष म्हणजे, २०२५ मध्येही अशाच प्रकारची अफवा पसरली होती. त्यावेळी टीमने अधिकृत पत्रक काढून म्हटले होते की, "काही वेबसाइट्स तब्बूच्या नावाने अपमानास्पद विधानं चुकीच्या पद्धतीने सादर करत आहेत. हे नैतिकतेचे उल्लंघन असून अशा बनावट बातम्या त्वरित हटवून माफी मागावी".


तब्बूचं वैयक्तिक आयुष्य आणि अफेअर्सच्या चर्चा
तब्बूचं नाव दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याशी जोडलं गेलं होतं. त्यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक वर्ष रंगल्या, पण दोघांनीही कधीच अधिकृत दुजोरा दिला नाही. तसेच अभिनेता अजय देवगण आणि तब्बूची मैत्रीही सर्वश्रुत आहे. "अजयमुळेच मी आजही अविवाहित आहे" असं गमतीने तब्बू एकदा एका मुलाखतीत म्हणाली होती, मात्र ते दोघे केवळ जिवाभावाचे मित्र आहेत.

'दृश्यम ३' मध्ये पुन्हा दिसणार जलवा
कामाच्याबाबत बोलायचे झाले तर, तब्बू लवकरच 'दृश्यम ३' या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगण आणि तब्बू या जोडीने आधीच्या दोन भागांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title : तब्बू का विवाह बयान: क्या उन्होंने सच में ऐसा कहा? तथ्य जांच।

Web Summary : ऑनलाइन अफवाहें फैलीं कि तब्बू को सिर्फ सोने के लिए एक आदमी चाहिए। उनकी टीम ने बयान का खंडन करते हुए इसे झूठा और भ्रामक बताया। इसी तरह की अफवाहें 2025 में भी फैली थीं, जिसका उनकी टीम ने खंडन किया था। वह जल्द ही 'दृश्यम 3' में दिखाई देंगी।

Web Title : Tabu's marriage statement: Did she really say that? Fact check.

Web Summary : Rumors spread online claimed Tabu wants a man only for sleeping. Her team denied the statement, calling it false and misleading. Similar rumors circulated in 2025, also refuted by her team. She will soon appear in 'Drishyam 3'.