अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:59 IST2026-04-06T14:57:29+5:302026-04-06T14:59:16+5:30

तापसी पन्नू तिच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘गांधारी’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये झळकणार आहे.

Taapsee Pannu will be seen doing powerful action in gandhari movie | अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा

अनेक वर्षांनी तापसी पन्नू दमदार अ‍ॅक्शन करताना दिसणार; 'गांधारी' सिनेमाची चर्चा

तापसी पन्नू तिच्या बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन चित्रपट ‘गांधारी’ सह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज आहे. ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील तिच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, अभिनेत्री पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये झळकणार आहे. ज्यामध्ये तापसीने खरी मेहनत घेतली असून कोणताही शॉर्टकट न वापरता तिने स्वतः स्टंट केले आहेत. 

तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलताना तापसी म्हणाली, “माझा पुढचा चित्रपट ‘गांधारी’ आहे. ‘नाम शबाना’नंतर मी पुन्हा एकदा जबरदस्त अ‍ॅक्शन करत आहे. बऱ्याच कालावधीनंतर मला अ‍ॅक्शन करायला मिळाली आहे. हा असा जॉनर आहे, ज्याबद्दल लोक मला सतत विचारतात—तू पुन्हा अ‍ॅक्शन कधी करणार? त्यांना ‘बेबी’ आणि ‘नाम शबाना’मधील माझी अ‍ॅक्शन आठवते. ब्लू स्क्रीन किंवा फेस रिप्लेसमेंटशिवाय अ‍ॅक्शन करणं खूप कठीण असतं.”

चाहत्यांनी तापसू पन्नूच्या दमदार परफॉर्मन्सची खूप दिवसांपासून वाट पाहिली होती, आणि तापसी पुन्हा त्याच दमदार अंदाजात परतत आहे. तापसीची काम करण्याची पद्धत तिला या इंडस्ट्रीपासून वेगळी ठरवते. जिथे अनेकदा कलाकार VFX वर अवलंबून असतात तिथे तापसी स्वतः अ‍ॅक्शन परफॉर्म करताना दिसणार आहे.

स्वतः अ‍ॅक्शन करण्याबद्दल ती पुढे म्हणाली, “फेस रिप्लेसमेंटसारख्या तांत्रिक गोष्टी फक्त मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये वापरता येतात. माझ्या चित्रपटांमध्ये साधारणपणे एवढा बजेट नसतो, त्यामुळे मला स्वतः मेहनत करून अ‍ॅक्शन करावी लागते. जिथे मी हवेत उडून लढेन आणि खाली उतरेन, इतकी फॅन्सी अ‍ॅक्शन नसेल. कारण मला सगळं स्वतः करावं लागतं. त्यामुळे कलाकार म्हणून माझा कस लागतो.''

''‘नाम शबाना’नंतर मी जाणीवपूर्वक काही वर्ष अ‍ॅक्शनपासून दूर राहिले, कारण ते करणं शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारं असतं आणि स्वतःला पुन्हा तयार करावं लागतं. मी स्वभावतः आक्रमक व्यक्ती नाही… त्यामुळे ‘गांधारी’मध्ये तुम्ही मला भरपूर अ‍ॅक्शन करताना पाहाल. आणि हे सगळं मी स्वतः केलं आहे, त्यामुळे अशी अ‍ॅक्शन पूर्ण करणं माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या खूप थकवणारं होतं. यावर्षी पुढील काही काही महिन्यांतच हा सिनेमा तुम्ही पाहू शकाल.”

अलीकडेच ‘अस्सी’मध्ये तिच्या दमदार आणि भावनिक अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेली तापसी आता ‘गांधारी’च्या माध्यमातून अ‍ॅक्शन हिरोईझमची नव्याने ओळख प्रेक्षकांना करुन देणारी आहे.

Web Title : तापसी पन्नू वर्षों बाद 'गांधारी' में एक्शन करती दिखेंगी।

Web Summary : तापसी पन्नू अपनी नई एक्शन फिल्म 'गांधारी' से दर्शकों को रोमांचित करने के लिए तैयार हैं। 'बेबी' और 'नाम शबाना' के बाद, वह हाई-ऑक्टेन स्टंट के साथ वापस आ गई हैं, और उन्हें बिना किसी शॉर्टकट के खुद कर रही हैं। उन्हें यह शारीरिक रूप से चुनौतीपूर्ण लगता है।

Web Title : Taapsee Pannu returns to action with 'Gandhari' after years.

Web Summary : Taapsee Pannu is set to thrill audiences with 'Gandhari,' her new action film. After 'Baby' and 'Naam Shabana,' she's back with high-octane stunts, performing them herself without shortcuts. She finds it physically demanding and challenging.