काय सांगता, कॅटफाईटनंतर तापसी पन्नूला जॅकलिनकडूनच शिकायचा पोल डान्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 11:06 IST2019-03-30T10:47:15+5:302019-03-30T11:06:50+5:30
अभिनेत्री तापसी पन्नूला तिची 'जुडवा2' ची सहकलाकार जॅकलिन फर्नांडिसकडून पॉल डान्स शिकायची इच्छा आहे.

काय सांगता, कॅटफाईटनंतर तापसी पन्नूला जॅकलिनकडूनच शिकायचा पोल डान्स?
अभिनेत्री तापसी पन्नूला तिची 'जुडवा2' ची सहकलाकार जॅकलिन फर्नांडिसकडून पोल डान्स शिकायची इच्छा आहे. तापसी म्हणाली, ''मला जॅकलिनकडून पॉल डान्स शिकण्याची इच्छा आहे. मी पॉल डान्स करणार हे ऐकून तुम्हाला थोडेस नवल वाटेल पण मला जॅक सोबत वर्कआऊट करायचे आहे.'' तापसी आणि जॅकलिनमध्ये कोल्ड वॉर असल्याची चर्चा 'जुडवा 2'च्या शूटिंग दरम्यान ऐकायला मिळते होत.
ऐवढंच नाही तर दोघींनी पुन्हा एकमेंकीसोबत काम करणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तापसीने जॅककडून डान्स शिकण्याची इच्छा बोलून दाखवल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
तापसीचा नुकताच 'बदला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला या सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर तापसीची वर्णी संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमात लागली आहे. साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकमध्ये तापसी अभिषेक बच्चनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तापसीला ही कथा प्रचंड आवडली आणि तिने लगेच या बायोपिकसाठी होकार दिला. या बायोपिकमध्ये अभिषेक साहिर यांच्या भूमिकेत तर तापसी अमृता प्रीतम यांच्या भूमिकेत दिसेल. यापूर्वी अभिषेक व तापसी या जोडीने अनुराग कश्यपच्या ‘मनमर्जियां’मध्ये एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर तापसी भूमी पेडणेकर 'सांड की आँख' सिनेमात दिसणार आहे. जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या चित्रपटाची कथा आधारीत असून या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे.