आश्चर्यच! माझ्या एंगेजमेंटला मलाच बोलवलं नाही; तापसी पन्नूची सटकली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 06:07 IST2018-07-27T20:09:23+5:302018-07-28T06:07:29+5:30

प्रियांका व निक जोनास यांच्या साखरपुड्याची बातमी गोड धक्का देऊन गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी आली. ही अभिनेत्री होती, तापसी पन्नू.

taapsee pannu secretly got engaged with badminton player mathias bao | आश्चर्यच! माझ्या एंगेजमेंटला मलाच बोलवलं नाही; तापसी पन्नूची सटकली!!

आश्चर्यच! माझ्या एंगेजमेंटला मलाच बोलवलं नाही; तापसी पन्नूची सटकली!!

आज शुक्रवारी बॉलिवूडप्रेमींना धक्क्यावर धक्के मिळाले. आधी प्रियांका चोप्राने ‘भारत’ हा चित्रपट सोडल्याची बातमी आली. मग प्रियांका व निक जोनास यांच्या साखरपुड्याची बातमी गोड धक्का देऊन गेली. या धक्क्यातून सावरत नाही तोच आणखी एका अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा उरकल्याची बातमी आली. ही अभिनेत्री होती, तापसी पन्नू. होय, तापसीने डेनमार्कचा बॅडमिंटनपटू Mathias Boeसोबत साखरपुडा केला, असे वृत्त एका आॅनलाईन पोर्टलनी दिले. काही दिवसांपूर्वी तापसीचे आई-वडिल गोव्यात गेले होते. येथेच तापसीचा लग्न पक्के झाले, असे  या वृत्तात म्हटले गेले होते. तापसीने हे वृत्त पाहिले आणि तिची सटकली. अर्थात सटकल्यानंतरचा राग तिने उपहासात्मक पद्धतीने व्यक्त केला. 

‘खरचं? आश्चर्यचं आहे; माझा साखरपुडा अन् मलाचं बोलवलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगते माझे आई-वडिल गेल्या दहा वर्षांत गोव्याला गेलेले नाहीत. नाहीतर तुम्ही समजाल की, माझा साखरपुडा दहा वर्षांपूर्वींचं झाला,’ असे तापसीने सोशल मीडियावर लिहिले.
तापसीचा हा व्यंगात्मक बाण कितींना जिव्हारी लागला असेल, हे न सांगणेचं बरे.
तापसी लवकरच ‘मुल्क’ या चित्रपटात दिसणार आहे. येत्या ३ आॅगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. यात तापसी महिला वकिलाच्या भूमिकेत आहे. यानंतर सप्टेंबरमध्ये तिचा ‘मनमर्जियां’ रिलीज होऊ घातला आहे. यात ती विकी कौशल आणि अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. नुकताच तापसीचा ‘सूरमा’ रिलीज झाला. या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही.

 

Web Title: taapsee pannu secretly got engaged with badminton player mathias bao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.