Tapi Pannu and Rishi Kapoor's country's first look-out | तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांच्या मुल्कचा फर्स्ट लूक आऊट

तापसी पन्नू लवकरच मुल्क या चित्रपटात दिसणार आहे. 'मुल्क'चा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पहिल्यांदा तापसी ऋषी कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याआधी तापसीने अमिताभ यांच्यासोबत पिंकमध्ये काम केले आहे. 

मुल्कच्या फर्स्ट लूकमध्ये तापसी कोर्टमध्ये उभी राहून केस लढताना दिसते आहे. तापसीने स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा सोशल थ्रिलर चित्रपट आहे. यात तापसी वकिलाची भूमिका साकारणार आहे. मुल्क हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. तापसी यात ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सामान्य माणसाचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. वकिलची भूमिका साकार करण्यासाठी तापसी खूप मेहनत घेतली आहे. अनुभव सिन्हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. 27 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तापसी पुन्हा एकदा बिग बींसोबत सुद्धा काम करताना दिसणार असल्याची चर्चा आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. 'बदला' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.     

ALSO READ : चित्रपटानंतर तापसी पन्नू करणार हे काम

तापसी पन्नूने 'चष्मे बहाद्दूर' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र तिला खरी ओळख शूजित सरकार यांच्या ‘पिंक’ या चित्रपटातून मिळाली. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तेलगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे अनेक दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. दक्षिणेत मिळालेल्या प्रसिद्धीनंतर तापसी बॉलिवूडकडे वळली. चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. जुडवानंतर तापसी 'हॉकी पटू संदीप सिंग'च्या आयुष्यावर आधारित चित्रपटसुद्धा दिसणार आहे. चित्रपटात ती स्वत: एका हॉकी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करतो आहे. 
Web Title: Tapi Pannu and Rishi Kapoor's country's first look-out
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.