पुन्हा जुंपली! ‘सस्ती कॉपी’ म्हणत डिवचणाऱ्या कंगनाला तापसी पन्नूचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 10:45 IST2021-01-11T10:44:19+5:302021-01-11T10:45:59+5:30

होय, कंगना राणौत आणि तापसी पन्नू यांच्यात पुन्हा जुंपली आहे.

taapsee pannu reacts to kangana ranaut tweets about her | पुन्हा जुंपली! ‘सस्ती कॉपी’ म्हणत डिवचणाऱ्या कंगनाला तापसी पन्नूचा टोला

पुन्हा जुंपली! ‘सस्ती कॉपी’ म्हणत डिवचणाऱ्या कंगनाला तापसी पन्नूचा टोला

ठळक मुद्देकंगनाच्या ट्वीटला तापसीनेही जबरदस्त उत्तर दिले. तिने कंगनाचे नाव घेणे टाळले पण तिला टोलवण्याची संधी मात्र तिने नेमकी साधली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि तापसी पन्नू यांच्यात पुन्हा जुंपली आहे. होय, सोशल मीडियावर या अभिनेत्रींमध्ये नव्याने वाकयुद्ध छेडले आहे. अर्थातच याची सुरुवात केली ती कंगनाने. कंगनाने  काही ट्वीट रिट्वीट केले आणि तापसीला लक्ष्य केले. यानंतर तापसी गप्प थोडीच बसणार? तिनेही कंगनाला जशास तसे उत्तर दिले.
तर कंगनाने आधी काय केले तर एका चाहत्याचे ट्विट रिट्वीट केले. तापसीने कंगनाची कॉपी केली, असा दावा कंगनाच्या एका चाहत्याने केला होता. तापसी ही कंगनाची स्वस्त कॉपी असे या चाहत्याने म्हटले होते. हे पाहून कंगनाला तेव चढला. मग काय, तिने या चाहत्याने हे ट्वीट रिट्वीट करत, तापसीला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.

‘या जीनिअसआधी माझे भविष्य काय होते? हिने मला चिंतीत केले आहे. हिच्याबद्दल विचार केला तरी मला ईर्ष्या होते.  दुस-यांचे मला माहित नाही, पण ज्या जगात अशी कला,असे सौंदर्य आणि असे टॅलेंट आहे, त्या जगात  राहायची माझी इच्छा नाही,’ असे ट्वीट कंगनाने केले.

त्याआधीही एका ट्वीटमध्ये तिने तापसीची खिल्ली उडवली. ‘हा हा हा मी खूश आहे, ही माझी खरी चाहती आहे. हिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यावर रिसर्च करण्यात घालवले आहे. या सगळ्यांमुळे मी निराश वगैरे अजिबत नाही. बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मलाच कॉपी केले जाते,’ असे कंगना या ट्वीटमध्ये म्हणाली.

तापसीने दिले उत्तर...

कंगनाच्या या ट्वीटला तापसीनेही जबरदस्त उत्तर दिले. तिने कंगनाचे नाव घेणे टाळले पण तिला टोलवण्याची संधी मात्र तिने नेमकी साधली. तापसीने एक कोट शेअर केले. यात तिने लिहिले, ‘एका सक्षम आणि आत्मविश्वासू व्यक्तिला कोणत्याही गोष्टीपासून ईर्ष्या होत नाही. ईर्ष्या स्थिर असते आणि ते माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचे लक्षण आहे,’ असे तिने लिहिले.

Web Title: taapsee pannu reacts to kangana ranaut tweets about her