मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 10:02 IST2026-02-16T09:57:23+5:302026-02-16T10:02:00+5:30

अलिकडेच तापसीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने केलेल्या मिश्किल राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

Taapsee Pannu Favorite Politician Narendra Modi Vs Rahul Gandhi Viral Interview Video | मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..."

मोदी की राहुल? आवडता नेता कोण? तापसी पन्नू हात जोडून म्हणाली "मला देशात राहायचंय..."

Taapsee Pannu Favorite Politician : अनेक गाजलेले चित्रपट देणारी अभिनेत्री अशी तापसी पन्नूची ओळख आहे. तिनं आतापर्यंत केलेल्या चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिक-समीक्षकांची दाद मिळवली आणि स्वतःचा चाहतावर्गही निर्माण केलाय. तापसी पन्नू तिच्या सिनेमासोबतच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही कायम चर्चेत येत असते. अलिकडेच तापसीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने केलेल्या मिश्किल राजकीय वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. 

TV9 Bharatvarsh ला दिलेल्या मुलाखतीतील तापसीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात तापसीसोबत रॅपिड फायर राऊंड खेळण्यात आला. यामध्ये तिला विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातच एक प्रश्न होता की, "तुमचा आवडता राजकीय नेता कोण?"  यावर तिला  नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असे दोन पर्याय देण्यात आले होते. 

या प्रश्नावर तापसीने नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राकडे निर्देश केला. त्यानंतर तिने हात जोडून त्यांच्या पाया पडल्यासारखी अ‍ॅक्टिंग केली आणि पुढे येत मिश्किलपणे म्हणाली, "मला अजूनही भारतात राहायचं आहे". तिच्या या वक्तव्यावर न्यूज स्टुडिओमध्ये एकच हशा पिकला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तापसीच्या विनोदी बुद्धीचातुर्याचं अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, तापसीचा नवा चित्रपट 'अस्सी' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सामाजिक आशय असलेल्या आणि स्त्रीकेंद्री कथानकांना प्राधान्य देणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.  अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अस्सी'मधील तिची भूमिका देखील वेगळ्या धाटणीची असल्याचं सांगितलं जात आहे. यात तापसी एका वकिलाच्या भूमिकेत आहे.  ती एका बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी झगडताना दिसते.

Web Title : मोदी या राहुल? तापसी पन्नू भारत में रहना चाहती हैं।

Web Summary : तापसी पन्नू के एक राजनीतिक सवाल पर मजाकिया जवाब वायरल हो गया। मोदी और राहुल के बीच चयन करने के लिए कहे जाने पर, उन्होंने मजाकिया ढंग से मोदी को चुना और कहा कि वह भारत में रहना चाहती हैं। उनकी नई फिल्म 'अस्सी' रिलीज हो गई है।

Web Title : Modi or Rahul? Taapsee Pannu wants to stay in India.

Web Summary : Taapsee Pannu's witty response to a political question goes viral. Asked to choose between Modi and Rahul, she jokingly chose Modi, saying she wants to remain in India. Her new film 'Assi' is released.