Swara Bhasker : "डायरेक्टरने खोलीत बोलावलं, सीन ऐवजी एक रात्र..."; स्वराने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 16:04 IST2023-06-07T15:39:05+5:302023-06-07T16:04:38+5:30
Swara Bhasker : अभिनेत्री स्वरा भास्करही यातून गेली आहे. तिने तिचा भयंकर अनुभव सांगितला आहे.

Swara Bhasker : "डायरेक्टरने खोलीत बोलावलं, सीन ऐवजी एक रात्र..."; स्वराने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
सिनेसृष्टीत अनेकांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. अभिनेत्री स्वरा भास्करही यातून गेली आहे. तिने तिचा भयंकर अनुभव सांगितला आहे. एका जुन्या मुलाखतीत तिने कसं डायरेक्टरने तिच्याकडे रोलसाठी एक सेक्शुअल फेवर मागितलं होतं त्याबाबत मोठा खुलासा केला आहे. नशेत असलेल्या एका डायरेक्टरने खोलीत बोलावलं. तो तिला मिठी मारू पाहत होता. तिने या सर्व गोष्टीला स्पष्ट नकार दिला असं स्वराने म्हटलं आहे.
अभिनेत्रीने दिलेल्या या नकारामुळे तिला अनेक प्रोजेक्टमधून काढण्यात आलं. तिने डायरेक्टरची ही अट न स्वीकारल्याने काही प्रोजेक्ट हातातून गेले. स्वरा भास्करने सांगितलं की, "जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नव्हती तेव्हा डायरेक्टर मला टेक्स्ट आणि डिनरचं इन्व्हाईट्स पाठवून सतत त्रास द्यायचा. दिवसभर तो माझा पाठलाग करायचा आणि रात्री मला फोन करून त्रास द्यायचा."
"एका सीनसाठी त्याने मला हॉटेलच्या रुममध्ये यायला सांगितलं होतं. मी तिथे गेली तेव्हा तो ड्रिंक करत होता. पहिल्याच भेटीत तो लव्ह, सेक्स आणि वन नाईटबाबत बोलायला लागला. थोड्य़ावेळाने नशेतच तो माझ्या खोलीत आला आणि मला मिठी मारू लागला. मी तरुण होती, एकटी होती आणि खूप घाबरली होती."
"मी पॅकअपनंतर लगेचच सर्व मेकअप काढायची आणि पटकन लाईट्स ऑफ करायची म्हणजे त्याला वाटेल की मी झोपली आहे" असं म्हणत अभिनेत्रीने तिचा धक्कादायक अनुभव शेअर केला. स्वरा भास्करने याबाबत डायरेक्टरची एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसरकडे तक्रार देखील केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.