ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या लव्ह अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:58 IST2022-07-18T16:58:21+5:302022-07-18T16:58:55+5:30
Sushmita Sen, Vikram Bhatt : विक्रम भट व सुष्मिता सेन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण 1996 साली दोघांचं ब्रेकअप झालं.

ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या लव्ह अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअॅक्शन
ललित मोदी ( Lalit Modi) व सुष्मिता सेनच्या (Sushmita Sen) लव्ह अफेअरची चर्चा जोरात आहे. कपल एकमेकांच्या प्रेमात आहे, पण लोकांना अजूनही हे नातं पचलेलं नाही. सोशल मीडियावर अनेकजण सुष्मिताला ट्रोल करत आहेत. तिला संधीसाधू, पैशांची लोभी म्हणत आहेत. सुष्मिता व ललित मोदी दोघांनी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं. आता सुष्मिताचा एक्स-बॉयफ्रेन्ड व दिग्दर्शक विक्रम भट (Vikram Bhatt) हे सुद्धा तिच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. सुष्मिता गोल्ड डिगर नाही तर लव्ह डिगर असल्याचं विक्रम भट यांनी म्हटलं आहे.
विक्रम भट व सुष्मिता सेन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण 1996 साली दोघांचं ब्रेकअप झालं.
काय म्हणाले विक्रम भट
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विक्रम भट यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एखाद्याच्या प्रेमात पडण्यापूर्वी त्याचं बँक बॅलेन्स चेक करणाºयांपैकी सुष्मिता नाही. मी ‘गुलाम’ डायरेक्ट करत होतो, पण माझ्याजवळ तेव्हा पैसे नव्हते. मी कधीही विसरू शकत नाही की, सुष्मिता ती पहिली व्यक्ती होती, जी मला युएसला घेऊन गेली होती. तिने माझ्या ट्रिपचा सर्व खर्च केला होता. तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. आम्ही लॉस एंजिल्सला पोहोचल्यावर आम्हाला घ्यायला लिमोजिन कार आली होती. मी ती कार पाहून थक्क झालो होतो. यावर तुझी युएस ट्रिप मला स्पेशल बनवायची होती, असं सुष्मिता मला म्हणाली होती. मला वाटतं, लोकांच्या आयुष्याची खिल्ली उडवणं आजकाल मनोरंजन झालं आहे. जेव्हा करिनाने सैफ अली खानसोबत लग्न केलं होतं, तेव्हा ती ट्रोल झाली होती. तुम्ही सेलिब्रिटी असाल आणि तुमचा एखादा निर्णय आवडला नसेल तर लोक तुम्हाला ट्रोल करायला लागतात. सुष्मिता पैशाची नाही तर प्रेमाची भुकेली आहे, असं ते म्हणाले.
अलीकडे मी सुष्मिताच्या संपर्कात नाही. जवळपास 15 वर्षांपूर्वी आम्ही भेटलो होतो. पण आजही तिच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. माझ्या सारख्या पैसा नसलेल्या व्यक्तिला तिने ज्या पद्धतीने ट्रिट केलं, ते मी कधीही विसरू शकणार नाही. ती गोल्ड डिगर कधीच बनू शकत नाही. मी नेहमी तिच्यासाठी उभा राहील, असंही ते म्हणाले.