सुरू झाली सुश्मिता सेनच्या पुनर्पदापणाची तयारी, बनणार महिला पोलिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 19:40 IST2018-09-02T19:39:00+5:302018-09-02T19:40:22+5:30

अखेर सुश्मिता सेन परततेयं. होय, सुश्मिताच्या पुनर्पदापणाची तयारी झालीय. काही दिवसांपूर्वी सुश्मिताने स्वत: याबाबतचे संकेत दिले होते.

sushmita sen will comeback in bollywood after 8-years | सुरू झाली सुश्मिता सेनच्या पुनर्पदापणाची तयारी, बनणार महिला पोलिस!

सुरू झाली सुश्मिता सेनच्या पुनर्पदापणाची तयारी, बनणार महिला पोलिस!

अखेर सुश्मिता सेन परततेयं. होय, सुश्मिताच्या पुनर्पदापणाची तयारी झालीय. काही दिवसांपूर्वी सुश्मिताने स्वत: याबाबतचे संकेत दिले होते. काही स्क्रिप्ट मी वाचल्यात. यापैकी एक-दोन स्क्रिप्ट मला आवडल्यात. लवकरचं तुम्हाला याबद्दल कळेल,असे सुश्मिताने सांगितले होते. तर ती वेळ आलीयं.

 डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सुश्मिता सेनला एका प्रोजेक्टसाठी फायनल करण्यात आले आहे. यावर्षाअखेरिस या चित्रपटाचे शूटींग सुरू होऊ शकते. या स्मॉल टाऊन स्टोरीत सुश्मिता लीड रोलमध्ये दिसेल. मध्यप्रदेशच्या पार्श्वभूमीवरील या क्राईम बेस्ट चित्रपटात सुश्मिता महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका वठवणार आहे. ताज्या वृत्तानुसार, या रोलसाठी सुश्मिताला वर्षभरापूर्वीच विचारणा झाली होती. पण सुश्मिताला या भूमिकेबद्दल खात्री हवी होती. त्यानुसार, चित्रपटाचे नॅरेशन ऐकल्यानंतर सुश्मिताने स्वत: काही इनपुट्स दिलेत. सुश्मिताने सांगितल्यानुसार, मेकर्सनी काही बदल केलेत आणि स्क्रिप्ट फायनल झाली. तूर्तास या चित्रपटाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. पण लवकरचं ती होईल, असे सूत्रांकडून कळतेय. सुश्मिताच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे. 

सुश्मिता २०१० मध्ये आलेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून ती रूपेरी पडद्यापासून दूर आहे. 

Web Title: sushmita sen will comeback in bollywood after 8-years