कोट्यवधी लोकांना आवडले; पण सुश्मिता सेनला नाही भावले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 09:10 PM2018-08-24T21:10:21+5:302018-08-24T21:10:50+5:30

सन १९९९ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणे तुफान गाजले.यानंतर सुमारे २० वर्षांनंतर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात हेच ‘दिलबर’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले. 

sushmita sen likes orignal song of dilbar | कोट्यवधी लोकांना आवडले; पण सुश्मिता सेनला नाही भावले!!

कोट्यवधी लोकांना आवडले; पण सुश्मिता सेनला नाही भावले!!

googlenewsNext

सन १९९९ मध्ये आलेल्या ‘सिर्फ तुम’ या चित्रपटातील ‘दिलबर’ हे गाणे तुफान गाजले. अभिनेत्री सुश्मिता सेनवर हे गाणे चित्रीत केल्या गेले होते. गाणेही हिट झाले आणि चित्रपटही सुपरहिट झाला. यानंतर सुमारे २० वर्षांनंतर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटात हेच ‘दिलबर’ हे गाणे रिक्रिएट करण्यात आले. 

हे गाणे अभिनेत्री नोरा फतेही हिच्यावर चित्रीत केले गेले. या गाण्यात नोराने जणू आग लावली. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर हे गाणे अपलोड केले असता आत्तापर्यंत १७ कोटी ७६ लाखांवर लोकांनी ते पाहिले. पण सुश्मिताला मात्र ते फार भावले नाही. अलीकडे तिने आपली प्रतिक्रिया बोलून दाखवली. ‘दिलबर’ रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये नोराने चांगले काम केलेय. गाणे लोकांनाही आवडलेयं. पण मला मात्र याचे ओरिजनल व्हर्जनचं अधिक आवडते.
सुश्मिता २०१० मध्ये आलेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. तेव्हापासून ती रूपेरी पडद्यापासून दूर आहे. पण आता सुश्मिता परतणार आहे. होय, अनेक स्क्रिप्ट आल्यात़ त्यापैकी दोन फायनल केल्या आहेत. लवकरच या चित्रपटांच्या नावांची घोषणा होईल, असे सुश्मिता म्हणाली.

 आत्तापर्यंतच्या आयुष्यात ​सुश्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले.  इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. 

Web Title: sushmita sen likes orignal song of dilbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.