​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 10:22 AM2018-03-21T10:22:35+5:302018-03-21T16:11:49+5:30

सुश्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. सुश्मिता दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दलची ...

Sushmita Sen is in the discussion again! Wrote on Twitter, I'm just yours ... !! | ​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!!

​पुन्हा चर्चेत आली सुश्मिता सेन! ट्विटरवर लिहिले, मी फक्त तुझीच...!!

googlenewsNext
श्मिता सेन म्हणजे बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री. सुश्मिता दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबद्दलची बित्तंबातमी चाहत्यांना मिळत असते. अगदी सुशच्या वर्कआऊटच्या व्हिडिओपासून तर तिच्या रिलेशनशिप स्टेट्सबद्दल. होय, अगदी रिलेशनशिप स्टेट्सबद्दलही. खरे वाटत नसेल तर सुश्मिताची ताजी पोस्ट तुम्ही वाचायलाच हवी. या पोस्टमध्ये सुश्मिताने आपल्या रिलेशनशिप स्टेट्सचा खुलासा केला आहे. सुश्मिताने एक फोटो शेअर केला आहे. ‘आई अ‍ॅम नॉट सर्चिंग फॉर माय अदर हाफ. बिकॉज आई अ‍ॅम नॉट अ हाफ’... असे लिहिलेला हा फोटो आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने #Completely Yoursअसे लिहिले आहे.  तिच्या या पोस्टवरून सुश्मिता सिंगल नाही, असा अर्थ काढला जात आहे.  


 आत्तापर्यंतच्या आयुष्यात ​सुश्मिताचे नाव अनेकांशी जोडले गेले.  इंडस्ट्रीत अगदी नवखी असताना सुश्मिता व विक्रम भट्ट या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा  रंगल्या होत्या. सुश्मितासाठी विक्रमने आपल्या पत्नी व मुलीलाही सोडले होते. पण इतके करूनही सुश्मिता विक्रमच्या आयुष्यात टिकली नाही. पुढे विक्रमने या रिलेशनशिपबद्दल पश्चातापही व्यक्त केला होता. विक्रमनंतर सुश्मिताच्या आयुष्यात रणदीप हुड्डाची एन्ट्री झाली. सुश्मिताची दत्तक मुलगी रेनी हिलाही रणदीप आवडायचा. पण काही वर्षांत या रिलेशनशिपचाही शेवट झाला. केवळ रणदीपचं नाही तर, वसीम अकरम, बंटी सचदेवा, संजय नारंग, बिल्डर इम्तियाज खत्री यांच्यासोबतही सुश्मिताचे नाव जोडले गेले. यानंतर सुश्मिता आणि रितिक भसीन या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यात. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची खबरही आली होती. पण यानंतर जहीर खान आणि सागरिकाच्या लग्नात सुश व रितिक एकत्र दिसले होते. आपल्या पोस्टमध्ये सुश्मिता रितिकबद्दलचं बोलतेय की अन्य कुणाबद्दल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण काहीतरी शिजतेयं, इतकं मात्र नक्की.

ALSO READ : Viral Video : ​सुश्मिता सेनने मुलीला विचारला प्रश्न! उत्तर ऐकल्यावर हसून हसून दुखेल पोट!!

Web Title: Sushmita Sen is in the discussion again! Wrote on Twitter, I'm just yours ... !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.