सुष्मिताने 'मेहबूब मेरे' गाण्यावर 'या' कारणाने डान्स करण्यास दिला होता नकार, एका फॅनने सांगितला किस्सा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 15:53 IST2020-07-23T15:46:36+5:302020-07-23T15:53:31+5:30
हा किस्सा आहे हृत्विक रोशन आणि करिश्मा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'फिजा' सिनेमातील. या सिनेमातील 'महबूब मेरे' या गाण्यावर सुष्मिताने परफॉर्म केलं होतं.

सुष्मिताने 'मेहबूब मेरे' गाण्यावर 'या' कारणाने डान्स करण्यास दिला होता नकार, एका फॅनने सांगितला किस्सा!
मिस यूनिव्हर्स राहिलेली अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या नवीन वेब सीरीज 'आर्या' मुळे चांगली चर्चेत आहे. कारण बऱ्याच वर्षांनी ती अभिनय करताना दिसत आहे. यातील तिच्या कामाचं भरभरून कौतुकही केलं जात आहे. अशात तिच्या एका फॅनने सुष्मिताबाबतचा एक किस्सा सोशल मीडियावर शेअर केलाय. हा किस्सा सुष्मिताने केवळ लाइकच केला नाही तर त्याला रिट्विटही केलंय.
हा किस्सा आहे हृत्विक रोशन आणि करिश्मा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या 'फिजा' सिनेमातील. या सिनेमातील 'महबूब मेरे' या गाण्यावर सुष्मिताने परफॉर्म केलं होतं. सुष्मिताच्या या फॅनने ट्विटमध्ये सांगितले की, एकदा सुष्मिता सेनने 'महबूब मेरे' गाण्याच्या काही शब्दांवर डान्स करण्यास नकार दिला होता. हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. या गाण्यात शब्द होते की, 'आ गरमी ले मेरे सीने से'. याच शब्दांवर सुष्मिताने परफॉर्म करण्या नकार दिला होता.
या गाण्यातील हे शब्द ऐकल्यावर सुष्मिताने त्यांवर परफॉर्म करण्यास नकार दिला होता. नंतर म्युझिक डिरेक्टर अनु मलिकने या गाण्याचे शब्द बदलले होते आणि ते बदलून 'आ नरमी ले मेरी आंखों से' केले होते. तेव्हा कुठे सुष्मिता या गाण्यावर परफॉर्म करण्यासाठी तयार झाली होती. सुष्मिताने या ट्विटला दिलवाला इमोजी देऊन लाइक केलं. इतकेच नाही तर ट्विट रिट्विटही केलं.
दरम्यान, सध्या कोरोनामुळे सुष्मिता आपल्या परिवारासोबत आणि तिच्यापेक्षा १५ वर्षाने लहान असलेल्या बॉयफ्रेन्डसोबत घरीच टाइम स्पेंड करत आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो शेअर करत असते. नुकतेच सुष्मिताने इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. जे व्हायरल झाले होते. या व्हिडीओत तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल सुष्मिताच्या मुलींना शिक्षक बनून शिकवताना दिसला.
४४ वर्षीय सुष्मिता गेल्या दोन वर्षांपासून तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षे लहान असलेल्या रोहमनला डेट करत आहे. काही महिन्यांपूर्वीच रोहमन हा सुष्मिता आणि तिच्या मुलींसोबत शिफ्ट झालाय. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, कपल लवकरच लग्न करणार आहे. पण सुष्मिताने असं काही नसल्याचं सांगितलं होतं.