सुशांतच्या मृत्यूवर मुकेश भट्ट म्हणतात, असं काही तरी होणार याची मला कल्पना होती...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 19:07 IST2020-06-14T19:00:33+5:302020-06-14T19:07:37+5:30
त्याचवेळी दिग्दर्शक मुकेश भट्ट म्हणतात की, 'असं काही तरी होणार याची अगोदरच कल्पना होती.'

सुशांतच्या मृत्यूवर मुकेश भट्ट म्हणतात, असं काही तरी होणार याची मला कल्पना होती...
नवी दिल्लीः अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं आत्महत्या केल्यानं चित्रपटसृष्टीनं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सुशांत सिंग राजपूत यानं रविवारी मुंबईस्थित वांद्रे येथील घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्सनी सोशल मीडियावर आश्चर्य आणि दुःख व्यक्त केले आहे. अक्षय कुमार, कियारा अडवाणी, करण जोहर, एकता कपूर, दिशा पटानी, अजय देवगण अशा कलाकारांनी सुशांतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी सुशांतने या जगाला निरोप दिला. त्याचवेळी दिग्दर्शक मुकेश भट्ट म्हणतात की, 'असं काही तरी होणार याची अगोदरच कल्पना होती.'
मुकेश भट्ट सुशांतच्या आत्महत्येविषयी टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेलवर बोलले. मुकेश भट्ट म्हणाले की, 'तो माझ्याकडे आला होता. मी त्याच्याशी बोललोही होतो, त्याच्या बोलण्यातून मला जाणवले की तो अस्वस्थ आहे. मग मला समजले की, त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. आम्ही 'सडक 2' मध्ये एकत्र काम करण्याचा विचार करत होतो. महेश भट्ट सुपरहिट चित्रपट 'सडक'चा रिमेक तयार करत आहेत, यात आलिया भट्ट, कुणाल रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्ट दिसणार आहेत.
दुसरीकडे सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला आणि तेव्हापासून हा मृत्यू आत्महत्या मानला जात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे आणि पोलिसांच्या अधिकृत निवेदनानुसार त्यांना कोणतीही सुसाइड नोटदेखील मिळालेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्याचा मृतदेह रुग्णालयाच्या पोस्ट मॉर्टेममध्ये नेण्यात आला आहे. सुशांतने आत्महत्येसारखे इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र नैराश्यातून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.While talking to Sushant, I’ve felt that Sushant was a very disturbed soul. There was something in him which I felt that he was not connected: Mukesh Bhatt, Film Producer tells TIMES NOW. | #SushantNoMorepic.twitter.com/KHDmAFYvAa
— TIMES NOW (@TimesNow) June 14, 2020
सुशांत एक लोकप्रिय अभिनेता होता. फार कमी वेळात त्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सुशांतने छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘किस देश में हे मेरा दिल’ ही त्याची पहिली मालिका होती. यानंतर एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत सुशांतला संधी मिळाली आणि या एका संधीने त्याचे आयुष्य बदलले. या मालिकेने सुशांतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर सुशांत बॉलिवूडकडे वळला होता.
हेही वाचा
'लुटेरी दुल्हन' गजाआड, पोलीस अधिकारी अन् राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
...तर परराष्ट्र धोरण रीसेट करावं लागेल, सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
"एक दिवस POKचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात राहायचं"